शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

केवळ इंधन खर्च भागविण्याइतके मिळतेय एसटीचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे लालपरीची चाके तब्बल दोन महिने रुतून बसली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला अन‌् ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे लालपरीची चाके तब्बल दोन महिने रुतून बसली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला अन‌् सरकारने नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार एसटीला कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करून प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळाली. ७ जूनला सांगोला आगारातून लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली. पहिल्या दिवशी सांगोला आगारातून सोलापूर-अकलूज-पंढरपूर या मार्गावर ९०० किमी एसटी धावली आणि सात फेऱ्यांतून १४० प्रवाशांच्या चढ-उतारामधून आगाराला १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दररोज एसटीच्या फेऱ्या वाढल्याने आगाराच्या उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे.

या मार्गावर धावतेय एसटी

सध्या सांगोला आगारातून मुंबई, पुणे, हैदराबाद, सातारा, अहमदनगर, कराड, पणजी, कोल्हापूरपर्यंत लांबपल्ल्याच्या तर सोलापूर, मंगळवेढा, जत, आटपाडी, अकलूज, पंढरपूर ग्रामीण मार्गावर सांगोला आगारातून दररोज ३७ बसेस ९६ फेऱ्या करून १४ हजार किमी धावतात. त्यामुळे दररोज ६ हजार प्रवाशांच्या चढ-उतारामधून आगाराला तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातून एसटीच्या इंधनाचा खर्च भागविला जातोय, एवढीच जमेची बाब आहे.

शाळा सुरू झाल्यास उत्पन्नात वाढ होईल

ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद आहे त्या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ढालगाव व खवासपूर मुक्कामी बस चालू केल्या जाणार आहेत. सांगोला शहरातील शाळा-महाविद्यालये सुरू नसल्यामुळे ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. शाळा सुरू झाल्यास एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल, असे आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी सांगितले.

कोट ::::::::::::::::

कोरोनाचे संकट टळले नसल्यामुळे एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असला तरी मालवाहतुकीने एसटीला तारले आहे. सांगोला आगारातून दररोज ४ मालवाहतूक बस ४८ रुपये किलोमीटरने धावतात. त्यामुळे इंधन खर्च वजा जाता आगाराला १५ ते १६ हजार रुपये उत्पन्न मिळते, ही जमेची बाजू आहे.

- पांडुरंग शिकारे,

आगारप्रमुख, सांगोला