शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर नदीपात्रात कोसळून चालकांचा जागीच मृत्यू, सांगोलाजवळील कोरडा नदी पुलावरील घटना

By admin | Updated: April 18, 2017 18:10 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि १८ : भरधाव ट्रॅक्टरचे चाक अचानक पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर पुलावरून नदीपात्रात कोसळून चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवार १७ एप्रिल रोजी मध्यरात्री जवळा-सोनंद रोडवरील कोरडा नदी पुलावर घडला आहे. कैलास शिवाजी भोसले-२४, रा.खोमनाळ (ता.मंगळवेढा)असे अपघातात ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. खोमनाळ येथील कैलास शिवाजी भोसले हा एम.एच.१३-जे.३१६८ हा ट्रॅक्टर सोमवारी रात्रौ साडेदहाच्या सुमारास जवळ्याकडून सोनंद रोडवरील केदार यांच्या पेट्रोलपंपावर कामानिमित्त घेवून गेला होता.  मात्र पंपावर ट्रॅक्टरचे दुकान बंद असल्याने कैलास भोसले यांनी परत ट्रॅक्टर घेवून तो शिरशीकडे निघाला होता. यावेळी, भरधाव ट्रॅक्टर कोरडा नदीच्या पुलावरून जात असताना अचानक ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाल्याने व ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो नदीपात्रात कोसळल्याने हा अपघात घडला. अपघातात कैलास शिवाजी भोसले गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. बाबासाहेब अंबादास बाबर यांनी अपघाताची माहिती ट्रॅक्टर मालक उत्तम शामराव भुसे यांना मोबाईलवरुन दिली. पोलीसांनी ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याने तो स्वत:च स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला असे फियार्दीत नमूद केले आहे. उत्तम शामराव भुसे यांनी पोलीसात खबर दिली असून तपास हवालदार आप्पा कर्चे करीत आहेत.