शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीची सुलभतेने अंमलबजावणी करा, केंद्राचे सहसचिव विश्वास यांचे सोलापूरात वक्तत्व

By admin | Updated: July 14, 2017 17:03 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी करताना ग्राहक, व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी घ्या. ही नवी करप्रणाली सुरळीतपणे लागू व्हावी यासाठी प्रयत्न करा अशा सूचना भारत सरकारचे सहसचिव समीर विश्वास यांनी आज येथे केल्या.वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी सुरळीतपणे व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सहसचिव सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज (गुरुवारी) व्यापारी, विक्रेते प्रतिनिधी, ग्राहक संघटना प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी यांच्या बैठका घेतल्या. अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सहायक आयुक्त राकेश नडवाल, वस्तू सेवाकर विभागाचे सहायक आयुक्त उमाकांत बिराजदार आदी उपस्थित होते.विश्वास यांनी यावेळी वस्तू आणि सेवाकराच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि यंत्रणा विकसित केल्या आहेत. या सुविधा आणि यंत्रणांचा कार्यक्षमपणे वापर करून वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना वस्तू आणि सेवाकरामुळे कर प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी होणार आहे. ही कर प्रक्रिया ग्राहक, व्यापारी आणि उद्योजक यांना समजावून सांगावी. या करप्रणालीबाबत जागरुकता निर्माण करावी. त्यासाठी असणाऱ्या माहिती केंद्राचा वापर केला जावा, अशाही सूचना केल्या. वस्तू आणि सेवाकर प्रणालीसंबंधी केंद्र सरकारची वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप, माहितीपत्रके, पुस्तिकांचा वापर करावा, असेही विश्वास यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली निवेदने विश्वास यांना दिली. ग्राहक आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी चर्चा केली.