शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तोत्के चक्रीवादळाचा सोलापूर जिल्ह्यात परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:20 IST

सोलापूर : तोत्के चक्रीवादळाचा परिणाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यावरही झाला. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर वादळी वारे वाहत ...

सोलापूर : तोत्के चक्रीवादळाचा परिणाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यावरही झाला. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर वादळी वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली.

तोत्के वादळाचा सोलापूर जिल्ह्याला धोका नसला तरी रविवारी जोराचा वारा व पावसाचे आगमन झाले. शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून जोरात वाऱ्याची सुरुवात झाली. रात्रभर अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. रविवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. अनेक ठिकाणी सरीही कोसळल्या. सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.

माढा तालुक्यात मोडनिंब व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतातील मक्याची पिके आडवी झाली, तर शेतकऱ्यांच्या झाडाचे आंबे वादळी वाऱ्यामुळे खाली पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. सांगोला तालुक्यात आंबा, डाळिंब, द्राक्ष आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यात चिकमहूद येथील सात शेतकऱ्यांच्या ६.३ हेक्‍टर क्षेत्रावरील टमाटा, केळी, डाळिंब फळ पिकांचे नुकसान झाले आहे.

--------

वादळामुळे आणखी दोन पावसाची शक्यता

तोत्के वादळामुळे दोन दिवस हवामानात बदल होणार आहे. या दोन दिवसांत जोराचा हवा आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापुरात वादळाचा खूप कमी प्रमाणात परिणाम होणार असली तरी आणखी दोन दिवस जोराचा वारा व पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर हे वादळ पश्चिम महाराष्ट्रातून गुजरातकडे सरकणार असल्याचे विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे सांगण्यात आले.