शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 11, 2014 00:07 IST

करमाळा : पोटेगाव येथे सीना नदीच्या पात्रातून पाच जेसीबी व तीन पोकलेनच्या सहाय्याने रोज शंभर ट्रक वाळूचा उपसा सुरू असून प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असून जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या ठेक्यावर कारवाई करावी व ठेकेदाराला पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी मनेसेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली आहे.

 

करमाळा : पोटेगाव येथे सीना नदीच्या पात्रातून पाच जेसीबी व तीन पोकलेनच्या सहाय्याने रोज शंभर ट्रक वाळूचा उपसा सुरू असून प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असून जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या ठेक्यावर कारवाई करावी व ठेकेदाराला पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी मनेसेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली आहे.पोटेगाव ता.करमाळा येथील वाळूचा लिलाव झाला आहे. ठेकेदाराने मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू केला आहे.ज्या जमिनीच्या गट नंबर मधून वाळू उपसण्यास परवानगी दिली आहे तो गट सोडून संपूर्ण नदीच्या पात्रातूनच उपसा सुरू आहे. तीन फुटापेक्षा जास्त खोल वाळूचा उपसा करू नये असा नियम असताना तीस फूट खोल खड्डे जेसीबीने खणून वाळू उपसली जात आहे. कोणत्याही वाळू वाहतूक करणार्‍या गाडीला पावती दिली जात नाही. २१०० ब्रास वाळू उचलण्याचा ठेका असताना दहा दिवसात जवळपास १० हजार ब्रास वाळू उपसण्यात आली आहे. याबाबत तहसील कार्यालयात तक्रार दिली असता उलटसुलट उत्तरे देऊन दुर्र्लक्ष केले जात आहे. या वाळूच्या ठेक्यात राजकीय पदाधिकारी असून, या प्र्रकरणात अधिकारी कारवाई करीत नाहीत. पोटेगावमधून विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा वाळू ठेका रद्द करून बेकायदा वाळू उपसा करणार्‍यावर कारवाई करून त्यांना दंड करावा अन्यथा मनसेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. (वार्ताहर)--------------------------------------------------------------------------------------रामवाडी वाळू ठेक्याच्या स्थगितीविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणाररामवाडी ता.करमाळा येथील भीमा नदीपात्रातील वाळू परवानगी नसताना उचलणार्‍या ठेकेदाराची ६ कोटी ५० लाखांची अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी घेतला. हा निर्णय ऐतिहासिक असून वाळू ठेकेदारांना जरब बसावी म्हणून घेतलेला निर्णय होता पण या निर्णयास महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने या स्थगिती विरोधात आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे मनसेचे नानासाहेब मोरे यांनी सांगितले.