शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर खुनीहल्ला करून पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

वैराग : धामणगाव (ता. बार्शी) येथे घरगुती कारणावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याच चाकूने स्वत:चा ...

वैराग : धामणगाव (ता. बार्शी) येथे घरगुती कारणावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याच चाकूने स्वत:चा गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. मयत उत्तम शंकर गाडे (वय ६५) आणि जखमी मथुरा उत्तम गाडे (वय ६०) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत सून रेश्मा गाडे यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, उत्तम आणि मथुरा गाडे या दाम्पत्यास दोन मुले आहेत. दोघे विभक्त राहतात. शुक्रवारी मथुरा उत्तम गाडे या धाकट्या मुलाकडे शेळ्यांसाठी चारा घेऊन आल्या होत्या. शेतातून कंटाळून आल्याने त्या अंगणात लोखंडी काॅटवर आराम करीत होत्या.

दरम्यान, पती उत्तम शंकर गाडे हे गावातून तावातावाने आले. त्या वेळी या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. या वेळी खुनीहल्ल्याचा व आत्महत्येचा प्रकार घडला.

दरम्यान, जखमी मथुरा यांना वैद्यकीय उपचारासाठी बार्शी येथे दाखल केले आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक महारूद्र परजणे करीत आहेत.

---

दोन्ही मुले बाहेर गेली अन् वाद सुरु झाला

या दाम्पत्यात घरगुती कारणावरून वाद सुरु झाला. हा वाद होण्यापूर्वी मुले घरातून बाहेर गेली होती. तेथे त्यांचा वाद सोडवायला कोणीच नव्हते. दोघांत कडाक्याचे भांडण झाले. या वादविवादाचे पर्यावसान पत्नीवरील हल्ल्यात झाले. मथुरा यांच्या गळ्यावर व पोटावर लोखंडी सुरीने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याच सुरीने उत्तमने स्वतःचा गळा कापून घेतला. या घटनेत ते जागेवरच मरण पावले.