शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

एनटीपीसी परिसरातील रुग्णसंख्येची शंभरीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:21 IST

होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या आवारात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. या परिसरात ...

होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या आवारात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. या परिसरात राज्याबाहेरून आलेले अनेक मजूर, ठेकेदार आणि कामगार आहेत. त्यांचा स्थानिकांशी फारसा संपर्क नाही. तरीही दररोज त्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय एनटीपीसी प्रशासनाने घेतला. या चाचण्यांमध्ये रोजच पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहेत.

चाचणीत मजुरांची संख्या सर्वाधिक आढळली. मजूर आणि कामगार परिसरात वास्तव्यास आहेत. सर्व जण एकत्रित काम करतात स्थानिकांची संख्या ही मोठी असून, परस्पर संपर्कामुळे कामगार, मजूर आणि अधिकाऱ्यांना बाधा मोठ्या प्रमाणात झाली आहे. एनटीपीसीच्या हॉस्पिटलमध्ये अनेकांना प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

----

प्रमुख अधिकाऱ्यांना लागण

एनटीपीसीमध्ये परप्रांतीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रकल्पाच्या परिसरात या अधिकाऱ्यांची वसाहत आहे. सामान्य नागरिकांशी त्यांचा क्वचितच संबंध येतो, तरीही या वसाहतीत वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

------

पूर्वीपासून कडक निर्बंध

भारतात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून एनटीपीसी व्यवस्थापनाने त्यांच्या सर्वच प्रकल्पांमध्ये कडक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती. मागील वर्षी सलग पाच महिने या परिसराचा संपर्क बंद केला होता. सुरक्षाव्यवस्था कडक केली होती.

----