शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

फलोत्पादन अभियान : सोलापूरची आघाडी

By admin | Updated: September 3, 2014 00:39 IST

राज्यभरातून अवघ्या १६ हजार शेतकऱ्यांची मागणी

 सोलापूर: राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतीपूरक योजनांसाठी राज्यभरातून १६ हजार २०९ शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केले असून एकट्या सोलापूर जिल्ह्यातून ५ हजार ६०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नाशिक, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, धुळे व बुलढाणा जिल्ह्यातूनही फलोत्पादनासाठी शेतकरी पुढे आले आहेत.राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेती व्यवसायासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातून आलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा फलोत्पादन अभियान समितीमार्फत आलेल्या अर्जातून सोडत काढली जाते. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज असले तरच सोडत काढण्यात येते. सेटनेट, पॅकहाऊस, प्रक्रिया केंद्र अशा २८ बाबींसाठी शासनाचे अनुदान मिळते. सोलापूर, जालना, नाशिक, औरंगाबाद, धुळे, बुलढाणा, कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यातून फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. -------------------------सोलापूरपाठोपाठ नाशिक जिल्हा४ सोलापूर- ५,६०९, नाशिक-२१७८, जालना- १६९५, अहमदनगर- १२२६, औरंगाबाद-९८३, धुळे- ६४९, बुलढाणा- ५०८, कोल्हापूर-४२६, जळगाव-४४४, सातारा-२७४, परभणी-२२३, वाशिम-२०८, सिंधुदूर्ग-१९७, लातूर-१८३, रत्नागिरी-१७५, नंदूरबार-१७५, ठाणे-१२०, बीड-११०, नांदेड-१०२, सांगली-९९, वर्धा-९२, नागपूर-९१, रायगड-८७, यवतमाळ-७०, उस्मानाबाद-६०, अमरावती-५१, पुणे-४९, गोंदिया-४०, हिंगोली-३६, अकोला-३०, गडचिरोली-७, चंद्रपूर-६, भंडारा-४ याप्रमाणे फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.-------------------------------------पंढरपूरच्या ११२५ शेतकऱ्यांची मागणी४जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केल्याने सोडतीतून नशीब आजमावे लागत आहे. पंढरपूर तालुक्यातून ११२५, करमाळा-८५९, माळशिरस-८१०, माढा-५३३, मोहोळ-४६२, दक्षिण सोलापूर-३७७, सांगोला-३७५, बार्शी-३५१, मंगळवेढा-३३८, उत्तर सोलापूर-१९७, अक्कलकोट-१८२़-------------------------------शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्यातून अर्जांची संख्या अधिक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सोडत काढण्यात आली आहे. जिल्ह्याला ९ कोटी ३५ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- रफिक नाईकवाडी, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी