शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

करमाळा, सांगोला येथे पावसाची जोरदार हजेरी

By admin | Updated: July 8, 2014 00:50 IST

पुनर्वसू बरसला; सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आशा पल्लवित

करमाळा-सांगोला : सोलापूर जिल्ह्यात रोहिणी, मृग आणि आर्द्रा ही भरवशाची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र पुनर्वसू नक्षत्राने जिल्ह्यात विशेषत: करमाळा व सांगोला येथे जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात हा पाऊस झाला आहे. करमाळा : पुनर्वसू नक्षत्रात दुसऱ्या दिवशीही करमाळा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेले महिनाभर पावसाच्या ओढीने आसुसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.रोहिणी,मृग,आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. दुपारी चार वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल पाऊण तास दमदारपणे पडला. तालुक्यातील गुळसडी, देवळाली, पांडे, खडकी, सरपडोह, वरकटणे, निंभोरे, केम, मांगी, रोसेवाडी, पिंपळवाडी, रावगाव, हिवरवाडी, वीट, अंजनडोह, हिसरे, फिसरे, सालसे या भागात पाऊस पडला आहे. पुनर्वसू नक्षत्रात सलग दोन दिवस पाऊस पडल्याने शेतकरी मका, सूर्यफूल,बाजरी पिकांची पेरणी करतील असे बोलले जात आहे. सांगोल्यात दीड तास पाऊससांगोला : सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात आज सोमवारी दुपारी चारनंतर अचानक पावसास सुरुवात झाली. दीड तास पडलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर पाणी वाहिले. उपनगरात पडलेल्या पावसामुळे नाल्यातून पाणी वाहू लागले. ग्रामीण भागातही रिमझिम पाऊस पडल्याचे वृत्त आहे. शहर व तालुक्यात रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरुच होता. पावसाने ओढ दिल्यामुळे तालुक्यात उन्हाळ्याची स्थिती असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. चालू वर्षी पावसाळ्यातील मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे चालल्याने शेतकऱ्यासह नागरीक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या तालुक्यात दुपारपर्यंत कडक ऊन पडत असून दुपारनंतर सतत वातावरणात बदल होत आहेत. दुपारनंतर ढगाळ वातावरणात हलकासा रिमझिम पाऊस पडत आहे. तालुक्यात अद्यापही खरिपाच्या पेरण्यालायक पाऊस पडला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आज सोमवारी दुपारनंतर आकाशात मेघ दाटून आले. चारनंतर पावसास सुरुवात झाली. दीड तास पडलेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरीक, आबालवृद्धांना थंडगार हवेचा दिलासा मिळाला आहे.