शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

धो धो पडला पाऊस,चार गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST

चपळगाव : पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यात चपळगाव मंडळात सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली. हरणा नदीमुळे पितापूर, अकतनाळ, ...

चपळगाव : पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यात चपळगाव मंडळात सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली. हरणा नदीमुळे पितापूर, अकतनाळ, तर ओढ्यामुळे डोंबरजवळगे, बऱ्हाणपूरचा संपर्क तुटला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत खरीप पिकांसाठी पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र हा पाऊस धोक्याची घंटा ठरला आहे. अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणातही पाणीसाठा वाढला आहे.

बोरी व हरणा या दोन नद्यांवर कुरनूर धरणाची मदार आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने लाभक्षेत्रात दमदार हजेरी लावली. हरणा नदी प्रवाहित झाली आहे. बोरी नदीचा पाण्याचा प्रवाह कमी असला तरी असाच पाऊस राहिल्यास लवकरच कुरनूर धरण पूर्ण क्षमतेने भरेल. शनिवारी सकाळपर्यंत धरणात ३२ टक्के पाणी साठा झाला. यापूर्वी धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा होता. तसेच डोंबरजवळगे परिसरात ढगफुटीसदृश स्थिती उद्‌भवली आहे. दोन दिवसांतील पावसामुळे डोंबरजवळगे-बऱ्हाणपूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली होती. चपळगाव मंडळात जुलै महिन्यात १३० मिलि पाऊस अपेक्षित असताना ९ जुलैपर्यंत १६२ मिलि म्हणजे केवळ नऊ दिवसांत १२६ टक्के पाऊस पडला आहे.

---

उडदात थांबले पाणी

खरीप पिकांसाठी हा पाऊस आता धोक्याची घंटा ठरत आहे. अजूनही काही शेतकऱ्यांनी पेरणी केली नसून पडलेल्या पावसाने लवकर वाफसा होण्याची शक्यता नसून परिणामी शेतात तण वाढणार आहे. चपळगाव परिसरात अनेक ठिकाणी उडदाच्या पिकात पाणी साचले आहे. ही पिके वाढण्यापूर्वीच धोक्यात आली आहेत.

---

पितापूरकरांवर दुसऱ्या वर्षींही संकट...

दरम्यान, शुक्रवारी पडलेल्या पावसाने हरणा नदीच्या काठावरील पितापूर गावात पाणी शिरले. यामध्ये कित्येकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्यासह संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी पितापूरकरांवर पावसाने संकट ओढावले आहे.

-----

१० चपळगाव १

हरणा नदी प्रवाहित झाली असून, दोन दिवसांतील पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे.

१० चपळगाव २

चपळगाव शिवारात पावसामुळे उडदाच्या पिकात पाणी साचले आहे. उडदाबरोबरच इतर पिकेही पाण्याखाली गेली आहेत.

100721\img-20210710-wa0020.jpg

हरणा नदी प्रवाहित..