शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी पाेलीसच करणार आषाढीचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST

आषाढी यात्रा भरली तरी गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून जीवित हानी होऊ नये, गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये, वारकऱ्यांची वारी ...

आषाढी यात्रा भरली तरी गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून जीवित हानी होऊ नये, गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये, वारकऱ्यांची वारी सुरक्षित व्हावी, यासाठी हजारो पोलिसांचा बंदोबस्त पंढरपुरात लावण्यात येतो. आता कोरोना संसर्गजन्य रोगामुळे आषाढी यात्रा मोजक्याच भाविकांत होत आहे. तरीही पंढरपुरात गर्दी होऊ नये, यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात हजारो पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भाविकांना पंढरपुरात येण्यापासून रोखण्यासाठी तीन स्तरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा हद्द, तालुका हद्द व शहर हद्दीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.

यासाठी १७०० पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात रिपोर्टिंग केले आहे. या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये केवळ ४ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी व गावी उपचारासाठी पाठवले असल्याची माहिती विक्रम कदम यांनी दिली.

बंदोबस्तासाठी पोलिसांचे ऑनलाईन रजिस्टर

स्वेरी महाविद्यालयाने आषाढी यात्रेच्या पोलीस बंदोबस्ताचे ऑनलाईन पध्दतीचे मोबाईल ॲप तयार केले आहे. यामध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची नोंद होते. त्यांना या ॲपद्वारे बंदोबस्त पाॅईंट, संबंधीत अधिकारी व इतर सूचना दिल्या जात आहेत. शुक्रवारपर्यंत १६०० च्या आसपास पोलिसांची नोंद करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात आणखी पोलीस यात्रेसाठी येणार असल्याची माहिती सपोनि. कपिल सोनकांबळे यांनी दिली.

पोलीस ठाण्यातच कोरोना तपासणी केंद्र

आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या माध्यमातून इतर कोणाला कोरोनाची लागण होऊ नये. यासाठी प्रत्येक पोलिसाची कोरोनाची चाचणी करण्यात येत असून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातच कोरोना तपासणीची २ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर बंदोबस्त वाटपासाठी एक केंद्र तयार करण्यात आले आहे. तसेच पोलिसांना आरोग्य किटचे वाटप करण्यासाठी देखील केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पयार यांनी दिली.

फोटो :::::::::

पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी कोरोना चाचणी करून घेताना, आरोग्य विभागाचे कर्मचारी व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, सपोनि. एम. एन. जगदाळे, सपोनि. कपिल सोनकांबळे, उपपोनि. प्रशांत भागवत.