शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

आरोग्य केंद्रांच्या माथी सोलर साहित्य

By admin | Updated: June 9, 2014 01:06 IST

शासनानेच दिला ठेकेदार: मागणी नसलेले साहित्य पाठविण्याचे प्रकार

सोलापूर:ज्याची गरज आहे ते मागणी करुनही मिळत नाही, परंतु शासन पातळीवरुन मागणी न करताही सहज मिळत आहे. जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रे तसेच ३० उपकेंद्रांना एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपयांचे सोलर पथदिवे, सोलर पॉवर पॅक व सोलर वॉटर हिटर बसविण्याचे आदेश शासन पातळीवरुनच दिले आहेत.अनुशेषांतर्गतच्या निधीतून राज्यभरातच निधी खर्च केला असून, सोलापूरच्या वाट्याला एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपये आले आहेत. आरोग्य केंद्राला व उपकेंद्राला जे मागितले जाते त्याचा विचार शासन पातळीवर लवकर केला जात नाही. परंतु कंपन्या व ठेकेदारांच्या आग्रहानुसार अनेक वस्तंूची खरेदी करुन जिल्हास्तरावर पाठवल्या जात आहेत. त्यामध्ये यावर्षी सोलर पथदिवे, सोलर पॉवर पॅक व सोलर वॉटर हिटर हे साहित्य पाठविण्यात आले आहे. या साहित्याचा पुरवठादार शासनाकडूनच ठरलेला असतो व तो थेट साहित्य बसवून जातो. ते चालते की बंद असते, याची तक्रार कोणीच करीत नाही कारण ते वापरात येईलच असे सांगता येत नाही. ---------------------------------जि.प.कडून खरेदी नाही?जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण खात्याला सेस व जिल्हा नियोजनने दिलेला निधी खर्च करण्यासाठी मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाली तर ठेकेदार मिळत नाही. मिळाला तर त्याला मंजुरी आदेश देण्यासाठी अनेकांना भेटावे लागते. ते परवडेनासे झाल्यानेच बेंचसाठीचे ९८ लाख रुपये खर्च झाले नाहीत. परंतु शासन पातळीवरुन आलेले स्वीकारण्याशिवाय पर्यायच नाही. ----------------------------------काय आहे सौर साहित्य ?प्रति सोलर दिव्याचा दर २५,६८५ रुपये, प्रति सोलर पॉवर पॅकचा २ लाख ८१ हजार, प्रति सोलर वॉटरसाठी एक लाख २७ हजार ३३० रुपयेप्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्राला प्रत्येकी चार पथदिवे तर प्रत्येकी एक सोलर पॉवर पॅक, सोलर वॉटर हिटर सिस्टीमचार आरोग्य केंद्रांसाठी एकूण १७ लाख ५८ हजार तर उपकेंद्रासाठी एक कोटी ५१ लाख ६३ हजार असे एकूण एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपये सौर साहित्यासाठी खर्च --------------------------------बंद दवाखाने अन् उपकेंद्रेहीमागील महिन्यात कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती जालिंधर लांडे यांनी जनावरांच्या दवाखान्यांची तपासणी केली होती. बहुतेक दवाखाने बंद व उघड्या असलेल्या दवाखान्यात डॉक्टर नव्हते. अशीच अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची आहे. अनेक उपकेंदे्र उघडलीच जात नाहीत. आरोग्य केंद्रात तर कर्मचाऱ्यांची संख्या पाहता रुग्णांची वर्दळ दिसायला हवी. मात्र कर्मचारी संख्येइतकेही रुग्ण आरोग्य केंद्रात येत नाहीत. अशा आरोग्य केंद्र व उपकेंद्राला सोलर पथदिवे, सोलर पॉवर पॅक व सोलर वॉटर हिटर बसविले जात आहेत.