शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडची हाैस पुरवण्यासाठी तो करायचा दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:17 IST

पंढरपुरात चोरलेली गाडी विक्री करणाऱ्या व्यक्तीला पकडून त्याच्याकडून ८ गाड्या जप्त केल्या. ही कारवाई पंढरपूर पोलिसांनी केली आहे. या ...

पंढरपुरात चोरलेली गाडी विक्री करणाऱ्या व्यक्तीला पकडून त्याच्याकडून ८ गाड्या जप्त केल्या. ही कारवाई पंढरपूर पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी महादेव सगर (वय २६, रा. बत्तीस खोल्या, पंढरपूर) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोपान नारायण बंडगर (वय ४२, रा. सलगरे, ता. मिरज, जि. सांगली) व रुकमांगद एकनाथ सोनुरे (रा. लिंगनूर) हे दोघे २५ डिसेंबर रोजी पंढरपूर दर्शनासाठी मोटरसायकल (क्र. एमएच १० बीके ५१०६)वरून आले होते.

ते दोघे २६ डिसेंबर रोजी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन एकादशीनिमित्त भजनाचे जागरच्या कार्यक्रमासाठी काळा मारुती वासकरवाडा येथे आले. तेथून त्यांची गाडी चोरीला गेली. याबाबत सोपान नारायण बंडगर याने पोलिसात तक्रार दिली.

यानंतर पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी तपासाची चक्रे फिरवत गाडी चोरणारा हा पंढरपूरचा असल्याची माहिती काढली. त्यानंतर महादेव सगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, बिपीन ढेरे, गणेश पवार, शरद कदम, सुजीत जाधव, सुनील बनसोडे, राजेश गोसावी यांनी केली आहे.