शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टमटम चालवून माणसे जोडली, गावकारभाऱ्याची स्टिअरिंगच मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST

वडवळ : भांबेवाडी येथील मगरधन नवनाथ साबळे... ३१ वर्षांचा तरुण... शिक्षण केवळ नववीपर्यंतच... व्यवसाय टमटमचालक... ग्रामपंचायत निवडणूक लागली ...

वडवळ : भांबेवाडी येथील मगरधन नवनाथ साबळे... ३१ वर्षांचा तरुण... शिक्षण केवळ नववीपर्यंतच... व्यवसाय टमटमचालक... ग्रामपंचायत निवडणूक लागली अन्‌ अनु. जातीच्या प्रभाग १ मधून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता सरपंचपदाचीही संधी मिळाली आहे. याचे कारण म्हणजे टमटम चालवीत असताना त्यांनी माणसे जोडली अन् आता गावकऱ्यांनी गावकारभार करण्याची संधीच दिली आहे.

भांबेवाडी ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ साली झाली. मात्र, आजवर एकदाही अनु. जातीच्या उमेदवाराला संधी मिळाली नव्हती. या वेळेस सरपंचपद अनु. जाती प्रवर्गसाठी राखीव झाले. स्थापनेपासून आजवर एकदाही बिनविरोध निवडणूक झाली नव्हती; पण या वेळेस प्रथमच ही जागाही बिनविरोध झाली अन् हा पहिला मान साबळे यांना मिळाला. सरपंचपदाची माळ गळ्यात पडली.

थोरला शिपाई अन् धाकटा भाऊ सरपंच

साबळे यांचे वडील नवनाथ साबळे यांनी याच ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून सेवा केली अन् निवृत्त झाले. त्यानंतर आता त्यांचा थोरला भाऊ रघुनाथ हे शिपाई म्हणून काम करत आहेत. अशा स्थितीत आता साबळे हे सरपंच झाले आहेत. थोरला भाऊ शिपाई अन् धाकटा भाऊ सरपंच, अशी भावनिक निवड या गावात प्रथमच झाली आहे. एका शिपायाचा मुलगा आता सरपंच झाला, याचा आनंद साबळे कुटुंबातील सर्व सदस्यांना झाला आहे. तरीपण टमटम चालवणार... या व्यवसायामुळेच प्रगती झाली. आता सरपंच झालो तरी गावचा कारभार पाहत टमटमही चालवणार आहे. ही टमटमच आपली खरी लक्ष्मी असून, हिचे ऋण विसरू शकत नसल्याचेही साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

फोटो

०६मगरधन साबळे-सरपंच