कुरुल : प्रगतिशील शेतकरी हरिभाऊ कुसाजी कुलकर्णी ( ८५, रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. समर्थ सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरुण कुलकर्णी यांचे ते वडील होत.
सुभद्राबाई गायधनकर
सोलापूर : सुभद्राबाई हरिबा गायधनकर (९५, रा. भाग्याेदय पीडब्ल्यूडी सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन नातू, तीन नाती असा परिवार आहे. माजी तहसीलदार गायधनकर यांच्या त्या मातोश्री होत.
निर्मला जाधव
सोलापूर : निर्मला मोहन जाधव (७२, रा. केदारनाथ सोसायटी, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आयटीआय महाविद्यालयातून वरिष्ठ लिपिकपदावरुन सेवानिवृत्त झाल्या होत्या. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे माजी अधीक्षक मोहन जाधव यांच्या त्या पत्नी होत.
मीनाबी मकानदार
मंद्रुप : मीनाबी युसूफ मकानदार (५९, रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असे परिवार आहे. प्रगतिशील शेतकरीर युसूफ मकानदार यांच्या त्या पत्नी होत.