शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

मंगळवेढ्याचे तहसिलदार प्रदीप शेलार यांच्या विरोधात हलगी मोर्चा

By admin | Updated: July 1, 2017 19:55 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरमंगळवेढा दि १ : संताची नगरी मानली जाणा-या मंगळवेढा तालुक्यात वाळू माफियांच्या घुसखोरीमुळे दहशत वाढत आहे. त्यामुळे जनतेला जीव मारण्याचा धमक्या येत आहेत. अनेकांना मारहान होत आहे. याला पुर्णता मंगळवेढा येथील कार्यरत असलेले तहसिलदार प्रदीप शेलार जबाबदार असून तहसिलदार यांच्या मानहानी व दहशतवादी कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान धोक्यात येत असल्यामुळे आज शनिवार दि.१ जुलै रोजी दामाजी चौकामधून हालगी मोचार्ने सुरवात करून प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.गेल्या १७ महिन्यापासून मंगळवेढा येथील कार्यभार सांभाळणारे तहसिलदार प्रदीप शेलार अधिकाराचा दूरूपयोग करून कर्तव्यात कसूर करीत आहेत. जाणीवपुर्वक चोरटया वाळूला पाठीशी घालत आहेत. त्यामुळे तालुक्यात व नदीकाठच्या भागात २०० हून अधिक ट्रॅक्टर जीसीबी ट्रकच्या सहायाने चोरटया मागार्ने अवैद्य वाळू उपसा व वाहतूक करीत आहेत. यावर कारवाई करण्याऐवजी तहसिलदार स्वहित साधण्यासाठी अर्थमैत्री ठेवून एकप्रकारे वाळू माफियांना पाठीशी घालत आहेत. चोरटया वाळूसाठी बोकाळलेली वाळू चोर गुंडगिरी प्रवृत्तीने दिवसरात्र दहशत ठेवून वाळू उपसा करीत आहेत. अनेकांना त्यांनी मारहाण केली जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, तक्रारदारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करून तहसिलदारांचया आशिवार्दाने लखपतीहोत आहेत. चोरटया वाळूमुळे प्रवाशी वाहतुकीला अडथळा होत असल्याने अपघात वाढत आहेत. रस्ते खराब झाल्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय, शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान, वाहनामुळे नोकरदार, व्यापारी, शेतक-यांची कामे खोळांबली, यासह अनेक समस्या दिवसेंदिवस वाढल्यामुळे तहसिलदारांकडून थेट जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार घडत आहे.गैरप्रकारच्या कामात रस ठेवून अर्थमैत्रीतून कारभार करणारे तहसिलदार मंगळवेढा लुटण्यास अभय देत आहेत. पुनर्वसन जमिन, उजनी प्लाट खरेदी विक्रीत हितसंबंध ठेवून कारभार करतात. कोटयावधीच्या बुडणा-या महसुलकडे कानाडोळा करणा-या व कर्तव्याचे भान विसरलेले तहसिलदार मंगळवेढयासह प्रशासनाला भारी पडत आहेत अशा तहसिलदारांचा कारभार मंगळवेढेकरांना पहिल्यांदाच अनुभव पहावयास मिळत असल्याने सर्व भागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी त्यांच्या विरोधात महसूलमंत्री, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी, उपोषण करून तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींना केराची टोपली दाखवून मुजोरपणे तालुक्यात अवैद्य मागार्ला खो घालणारे तहसिलदार प्रदीप शेलार हटाव चीमागण्यासाठी हे उपोषण सुरू केले आहे़यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पंचायत समिती सदस्य रमेश भांजे,सरपंच रामचंद्र मळगे, विलास व्हनुटगी,विनोद पाटील,संतोष सोनगे,दयानंद सोनगे,भाजपचे गौरीशंकर बुरकुल ,शशिकांत चव्हाण,बळीराजा संघटनेचे संतोष पवार,काँग्रेसचे मारुती वाकडे,होलार समाज अध्यक्ष हैदर केंगार, नाथा ऐवळे यांच्यासह ७०० ग्रामस्थ उपस्थित होते.