दक्षिण सोलापूर : माजी मंत्री तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्व. दि. शि. कमळे गुरुजींच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या प्रांगणात कमळे गुरुजींच्या समाधीला संस्थेचे विश्वस्त प्रा. व्ही.के. पाटील आणि जिल्हा परिषद माजी सदस्या कमलताई कमळे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी प्राचार्य सिकंदर नदाफ, प्रा. व्ही. के. पाटील, अमर कमळे, प्राचार्य एस. एम. नदाफ, अ. रजाक बागवान, सिद्राम बालगावकर, सेवानिवृत्त शिक्षक अरुण पाटील, जवळकोटे उपस्थित होते.
-----
०७ कमळे गुरुजी
स्व. दि. शि. कमळे गुरुजी यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करताना कमलताई कमळे, प्रा. व्ही. के. पाटील, अमर पाटील, प्राचार्य सिकंदर नदाफ, अ. रजाक बागवान, अरुण पाटील, सिद्राम बालगावकर.