शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तानंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

हरी पाहिला रे हरी पाहिला...!

By admin | Updated: July 23, 2014 00:57 IST

कामिका एकादशी: ७० हजार भाविकांची पंढरीत मांदियाळी

पंढरपूर : सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढ महिन्यात येणाऱ्या कामिका एकादशीला आज पंढरीत ७० हजार भाविकांची मांदियाळी दिसून आली. स्नानासाठी चंद्रभागेत भाविकांची गर्दी झाली होती. पददर्शन रांग आठ गाळे भरून गोपाळपूर रस्त्यावरील गॅस गोडावूनपर्यंत पोहोचली होती. आषाढ महिन्यात ही एकादशी येत असल्याने दर्शन करून मंदिरातून बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘हरी पाहिला रे हरी पाहिला’ अशा भावना पाहावयास मिळाल्या. दर्शनाच्या ओढीने मंदिर व चंद्रभागा वाळवंटाकडे जाणाऱ्या भाविकांमुळे पंढरीच्या सर्वच रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच पंढरपूर परिसरात रिमझिम पावसाची बरसात होती, यामुळे भाविकांना भिजतच पांडुरंगाचे दर्शन घ्यावे लागले. अशात आषाढी यात्रेसाठी चंद्रभागा नदीमध्ये सोडलेले उजनीचे पाणी सोलापूरसाठी पुढे वाहून गेल्याने चंद्रभागा नदी कोरडी पडली आहे. यामुळे चंद्रभागा स्नानासाठी भाविकांना मुबलक प्रमाणात पाणीच नव्हते. यामुळे त्यांना डबक्यात साचलेल्या पाण्यात डुबकी मारावी लागली. काहींनी कमी पाणी आणि तेही गढूळ असल्याने फक्त घोटेस्नान करणे पसंद केले. पंढरीत येण्यासाठी व जाण्यासाठी बस व रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती तर काही भाविक खासगी वाहनानेही पंढरीत दाखल झाले आहेत. दशमी, एकादशी झाल्यानंतर काही भाविक तत्काळ परतीच्या मार्गाला लागले तर काही भाविक द्वादशीला कळस, मुख व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन परत जाण्यासाठी पंढरीच्या मठ, मंदिर, धर्मशाळा व अन्य ठिकाणी मुक्कामी आहेत.--------------------------आॅनलाईनला चांगला प्रतिसादविठ्ठलभक्तांना झटपट दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने आॅनलाईन दर्शनाची सोय केली असून, दोन दिवसांत ५ हजार ६०० भाविकांनी दर्शन घेतले. सोमवारी दिवसभर १ हजार १०० तर मंगळवारी एकादशी दिवशी ४ हजार ५०० भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा लाभ घेतला.