शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने आगीशी खेळू नये; बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करावा! -राजू शेट्टी

By संताजी शिंदे | Updated: April 29, 2023 14:58 IST

"आंदोलकांवर केलेला बेछूट लाठीमार 'जनरल डायरला'ही लाजवणारा"

संताजी शिंदे, सोलापूर: बारसू रिफायनरी प्रकरणी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने तो प्रकल्प रद्द करावा. स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत,  त्यामुळे  सरकारने आगीशी खेळू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुट्टीवर पाठवून राज्य सरकारने आंदोलकावर केलेला बेछूट लाठीमार हा जनरल डायरलाही लाजवणारा आहे. हा अन्याय शेतकरी कधीही खपवून घेणार नाही. आतला-बाहेरचा असा शेतकऱ्यात भेदाभेद  करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शनिवार ते सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, युवक अध्यक्ष विजय रणदिवे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले की, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची नाळ ही शेती जोडली गेली आहे. त्यांचे वडील -भाऊ काळया आईची सेवा करतात. बारसू आंदोलनादरम्यान स्थानिक शेतकरी-महिलांवर निर्दयीपणे बेछूट लाटी हल्ला करताना शेतकरी पुत्र असणाऱ्या पोलिसांना मायेचा उमाळा कसा फुटला नाही ? असा प्रश्न उपस्थित केला.

स्थानिक व शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास बाहेरच्या लोकांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो .त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही छातीची ढाल करून अन्याय विरोधात शेतकऱ्याच्या बाजूने उभी असते. संकट समयी आम्ही शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही. बारसू येथील शेतकरी चीन, अमेरिकेचा नाही. तेथील स्थानिकांच्या व शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असणार असल्याचे यावेळी शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पRaju Shettyराजू शेट्टी