शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या टर्सरी प्रकल्पाच्या निविदेला शासनाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:05 IST

सोलापूर : मनपाच्या देगाव मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर उभारण्यात येणाºया टर्सरी प्रकल्पाचे टेंडर काढण्यास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देटर्सरी प्रकल्पामुळे मनपाचा चांगला फायदा होईलसव्वा वर्षात यावर १0 बैठका होऊन चर्चा झाली

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : मनपाच्या देगाव मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर उभारण्यात येणाºया टर्सरी प्रकल्पाचे टेंडर काढण्यास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिली. देगाव येथील ७५ एमएलडीचे अत्याधुनिक मलशुद्धीकरण केंद्र यापूर्वीच कार्यान्वित झाले आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी या एनटीपीसीच्या अधिकाºयांबरोबर या केंद्रातून ५२ एमएलडी प्रक्रिया केलेले पाणी घेण्याच्या करारावर सह्या केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जानेवारी २0१५ रोजी सोलापूरला भेट दिल्यावर शहराच्या पाणीटंचाईवर बैठक झाली होती. औज बंधाºयातून दर पाळीस गरजेच्या असणाºया अर्ध्या टीएमसी पाण्यासाठी उजनीतून दरवेळेस पाच टीएमसी पाणी भीमेत सोडावे लागते. पाणी सोडल्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसतात. याशिवाय पात्रात पाणी झिरपून नासाडी होते. हे टाळण्यासाठी देगाव मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी एनटीपीसीला द्यावे व त्या बदल्यात त्यांनी जलवाहिनीतून येणारे पाणी घ्यावे असे ठरले. यानंतर सव्वा वर्षात यावर १0 बैठका होऊन चर्चा झाली. सांडपाणी घेण्याच्या करारपत्राच्या मसुद्यास एनटीपीसीने मान्यता दिल्याचे २१ एप्रिल रोजी कळविले. त्यानंतर एनटीपीसीचे सरव्यवस्थापक प्रकाश तिवारी यांनी या करारावर सह्या केल्यावर शासनाकडे टर्सरी प्रकल्पाचा प्रस्ताव गेला. आता शासनाने टेंडर काढण्यास मंजुरी दिल्याने जी संस्था हे काम घेईल त्यांना प्रकल्प उभारणीचा खर्च करावा लागेल. त्यानंतर एनटीपीसीने घेतलेल्या पाण्याच्या बिलातून खर्चाची परतफेड होत जाईल. टेंडर प्रक्रियेत टर्सरी प्रकल्पामुळे मनपाचा चांगला फायदा होईल हे पाहिले जाईल असे आयुक्त ढाकणे यांनी यावेळी सांगितले.------------------२९६ कोटींचा प्रकल्पदेगाव केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर टर्सरी प्रकल्प उभारणे व तेथून पंपिंग करून हे पाणी एनटीपीसीला नेणे या कामाचा २९५ कोटी ५९ लाखांचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे.