शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांच्या प्रेमामुळे हत्तीचे बळ मिळाले आयुक्त गुडेवार: पाणीप्रश्न वर्षभरात मिटेल

By admin | Updated: May 9, 2014 00:13 IST

सोलापूर:सोलापूरकरांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो, कित्येक हत्तींचे बळ या प्रेमामुळे मला मिळाले असून, यापुढे देखील अधिक जोमाने काम करु, असे आश्वासन मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर दिले़ वर्षभरात पाणीप्रश्न मिटेल, असेही ते म्हणाले़

सोलापूर: सोलापूरकरांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो, कित्येक हत्तींचे बळ या प्रेमामुळे मला मिळाले असून, यापुढे देखील अधिक जोमाने काम करु, असे आश्वासन मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर दिले़ वर्षभरात पाणीप्रश्न मिटेल, असेही ते म्हणाले़आयुक्त गुडेवार यांनी गुरुवारी पदभार घेतला़ हारतुरे, सत्कारसोहळे पार पडल्यानंतर त्यांनी इंद्रभुवनाबाहेर बँजो गाडीत उभे राहून उपस्थित जनसमुदायासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या़ शहराचे नावलौकिक होईल अशा पध्दतीने काम करु़ माझ्या ४९ वर्षांच्या आयुष्यातील आनंदाचा हा परमोच्च क्षण आहे़ मी आयुष्यभर हे विसरु शकणार नाही़ खूप कमी अधिकार्‍यांना असे क्षण लाभतात़ मिळालेली ऊर्जा आयुष्यभर पुरेल़ अधिक जोमाने शहराचे काम करु, असेही गुडेवार म्हणाले़ यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनीही भाषण करुन गुडेवारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले़ गुडेवारांच्या कामात अडथळा निर्माण केला तर याद राखा, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला़ सुमारे एक तास सत्कार सोहळा सुरू होता़ हारतुर्‍यांचे ढीग इंद्रभुवनात साचले होते़ -----------------------------------------------स्वप्न साकार करु़़़दोन दिवसांपूर्वी मी पदभार सोडायला नको होता, मात्र त्याशिवाय तुमचे प्रेमही कळाले नसते (हशा़़़), अशा भावना आयुक्त गुडेवार यांनी व्यक्त केल्या़ शहराचे नावलौकिक होईल असे काम करुन दाखवू ़ शहराचे स्वप्न साकार करू, तुमचे प्रेम असेच राहू द्या, असे ते म्हणाले़ ------------------------------------------------------------------वर्षभरात पाणीप्रश्न मिटेल़ पाण्याचे जे जे विषय मनपा सभागृहापुढे निर्णयासाठी आहेत त्याबाबत मी महापौरांशी बोलणार आहे़ लवकरच या विषयांना मंजुरी देण्यात येईल़चंद्रकांत गुडेवारमनपा आयुक्त