शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलाच्या चरणी आलेले साेने, चांदी दुर्लक्षामुळे पोत्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:35 IST

गरिबांचा देव समजल्या जाणाऱ्या पांडुरंग व रुक्मिणी मातेला  भाविकांनी आजपर्यंत २८ किलो सोने व ९९६ किलो चांदी दान केली

पंढरपूर : गरिबांचा देव समजल्या जाणाऱ्या पांडुरंग व रुक्मिणी मातेला  भाविकांनी आजपर्यंत २८ किलो सोने व ९९६ किलो चांदी दान केली आहे. सोन्या-चांदीच्या विटा बनविण्याची परवानगी दिली, तर समितीला जतन करणे सुलभ होणार आहे. मात्र, प्रस्तावाकडे विधि व न्याय विभागाने दुर्लक्ष केल्याने सोने-चांदी पोत्यात बांधून ठेवण्याची वेळ आली आहे.पांडुरंगाच्या भक्तांकडून आपापल्या इच्छेनुसार व कुवतीनुसार लहान सोन्याचे मणी, अंगठ्या, नथ, मंगळसूत्र, चेन अशा विविध प्रकारचे दागिने देवाच्या दक्षिणा पेटीत अर्पण केले जातात. पांडुरंगाच्या दक्षिणा पेटीतील दक्षिणेची मोजणी होताना, त्या दक्षिणापेटीत बहुतांश वस्तू, दागिने आढळून येतात.  त्याचबरोबर काही भक्त १ ग्रॅम, २ ग्रॅमच्या सोने-चांदीच्या वस्तू थेट मंदिरात येऊन पावती करून जातात. भाविकांनी श्रद्धेने आणि प्रेमाने अर्पण केलेल्या लहान-लहान वस्तू कायमस्वरूपी देवाच्या खजिन्यात राहाव्यात यासाठी दोन वर्षांपूर्वी मंदिर समितीने या वस्तू वितळवून सोने आणि चांदीच्या विटा करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात समितीने विधि व न्याय विभागाकडे  पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. हा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या २८ किलो सोने आणि ९९६ किलो चांदीच्या हजारो वस्तू पोत्यात बांधून ठेवायची वेळ मंदिर समितीवर आलेली आहे.