शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ परिवाराने अडचणींवर मात करीत जपली उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने परिवारासह शेतकऱ्यावर चिंतेचे सावट होते. गतवर्षीच्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या ...

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने परिवारासह शेतकऱ्यावर चिंतेचे सावट होते. गतवर्षीच्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा मिळाल्या नव्हत्या तर ऊस तोडणी यंत्रणा आणि मजुरांची बिले थकली होती. गोकुळ परिवारावर भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करण्याचे आव्हान होते. नव्याने कारखान्याची सूत्रे हाती घेतलेले चेअरमन आणि कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे यांनी जिद्दीने त्यावर मात केली.

यापूर्वी गोकुळ शुगरने प्रतिटन २६१० रुपये दर दिला होता त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत तो उच्चांकी दर होता. गतवर्षीच्या हंगामासाठी या कारखान्याला २०१८ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली; मात्र कारखान्याने त्याहीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला. २१११ रुपयांप्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे, अशी माहिती चेअरमन दत्ता शिंदे, संस्थापक बलभीम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आगामी गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना बिलाची रक्कम दर दहा दिवसांनी अदा करण्यात येणार आहे. तीन हप्त्यात रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. गळीत हंगामापूर्वीची कामे संपत आली आहेत. यंदाच्या गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रतिदिन ४,५०० मे. टन गाळप क्षमता असून अठरा मेगावॅटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प आहे.याच गळीत हंगामापासून आसवनी (डिस्टिलरी) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे यांनी सांगितले.

कारखान्याकडे आगामी गळीत हंगामासाठी १०,५०० हेक्टर उसाची नोंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, तुळजापूर, बार्शी, उस्मानाबाद, मोहोळ आणि अक्कलकोट या सहा तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची नोंदणी सुरु आहे. तरी शेतकऱ्यांनी गोकुळ शुगरला ऊसपुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन दत्ता शिंदे, कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे डायरेक्टर विशाल शिंदे आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.

----

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केले आहे. आमच्या परिवाराची दयनीय स्थिती असताना वित्तीय संस्था, सहकाऱ्यांनी सहकार्य केले. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळेच सावरू शकलो.

-दत्ता शिंदे, चेअरमन आणि कार्यकारी संचालक, गोकुळ शुगर धोत्री (ता.दक्षिण सोलापूर )

--------

गोकुळ परिवाराची सूत्रे दत्ता शिंदे यांच्याकडे

भगवान शिंदे यांच्या निधनानंतर गोकुळ परिवार कोलमडला होता. या परिवाराने दत्ता शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली. धोत्री(ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर्सच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालक पदाची सूत्रे हाती येताच दत्ता शिंदे यांनी कारखान्याचा अडचणीत सापडलेला रथ मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने बाहेर काढला. सर्व प्रकारची देणी चुकती करून कारखाना सुस्थितीत आणला आहे.

---

फोटो : ०८ दत्ता शिंदे