पोलीस सूत्रांनुसार पाचीपट्टा परिसरातील शेतकरी आकाश चंद्रकांत देशमुख हा आपल्या शेतामध्ये शेळ्या चारत होता. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून दोघे शेतात आले. चरत असलेल्या दोन शेळ्या ते घेऊन जाताना शेतकरी देशमुख याने विचारणा केली. त्यालाच मारहाण करत त्याच्या खिशातील रोख १७ रुपये काढून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, देशमुख याने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी दुचाकीवरील (एम.एच. २५, ए.टी. ३२९६) दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सलमान मैजुद्दीन मुजावर व विशाल चंद्रकांत कांबळे (दोघे रा. अंबेजवळगे ता. उस्मानाबाद) असल्याचे सांगितले. यासंदर्भात मोहोळ पोलीस ठाण्याला शेतकऱ्यांनी संपर्क करून वरील दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. वरील दोघांवर चोरीचा गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस विजयकुमार माने करीत आहेत.
-----