शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या राखणाऱ्या मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती; आरोपीस अटक; लैंगिक छळाचा गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: October 24, 2023 14:26 IST

शेतात शेळ्या राखण्यासाठी येणाऱ्या साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पैसे देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

विलास जळकोटकर

सोलापूर : शेतात शेळ्या राखण्यासाठी येणाऱ्या साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पैसे देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. कोणाला सांगितले तर तुझ्या वडिलाला मारुन टाकतो अशी धमकी दिली. रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार एप्रिल ते मे २०२३ या कालावधीत शहराजवळील एका गावात घडल्याचे बुधवारी उघडकीस आले. या प्रकरणी कल्लप्पा उर्फ रंगा कामते (वय- ४९) याच्याविरुद्ध भा.दं. ३७६, बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

पिडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरानजीकच्या एका गावात १४ वर्ष सात महिने वयाची पिडिता आपल्या कुटुंबासमवेत राहते. मोलमजुरी करुन हे कुटुंब आपली गुजराण करते. मुलीने दीड वर्षांपूर्वी ९ वीतून शाळा सोडली असल्याने ती शेळ्या राखण्याचे काम करते.एप्रिल २०२३ च्या काळात शेळ्या राखण्यासाठी ती गेली असताना आरोपीची ओळख झाली. ती त्याला मामा म्हणून हाका मारायची. सुरुवातीला तोही मुलीसारखे बोलायचा. एकेदिवस त्याने पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला दुपारच्यावेळी शेतात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले. कोणाला सांगितले तर तुझ्या वडिलाला मारुन टाकेन अशी धमकी दिली. मे महिन्यापर्यंत तो वारंवार धमकी देऊन अत्याचार करायचा.

मे महिन्यापासून मासिक पाळी न आल्याने पिडितेच्या आईने तिला शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती २० आठवड्याची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले.आई वडिलांनी विचारणा करता पिडितेने केलेल्या कृत्याबद्ल आणि धमकी दिल्याबद्दल सांगितले. विजापूर नाका पोलिसांनी पिडितेचा जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सध्या पिडितेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तपास सपोनि जाधव करीत आहेत.