७ जानेवारी रोजी सायंकाळी मीना घोरपडे या शेतातून शेळ्या चारून येताना त्यातील एका शेळीने शेजारच्या घराजवळील मोकळ्या अंगणात लावलेला भाजीपाला खाल्ला. त्यामुळे अशोक ढेंगळे याने शिवीगाळ करीत लोखंडी गजाने मारहाण केली. यात घोरपडे यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर गंभीर दुखापत होऊन हात फॅक्चर झाला. हनुमंत ढेंगळे याने तुला जास्त मस्ती आली का? तुला दाखवतोच, असे म्हणत यानेही मारहाण केली. त्याचा नातेवाईक प्रमोद ऊर्फ पिंटू ढेंगळे यानेही शिवीगाळ करून डोक्याचे केस धरून मारहाण केली. तेव्हा त्या आरडाओरड करताच इतर लोकांनी सोडवासोडवी केली, अशी फिर्याद घेरपडे यांनी पोलिसात दिली आहे. जखमी घोरपडे यांना वैराग येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अंगणातला भाजीपाला शेळीने खाल्ला, ५० वर्षीय महिलेला मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST