भीमानगर : गेल्या १३ दिवसांपासून उजनी धरणाच्या गेटवर सुरू असलेल्या आंदोलनात आज प्रभाकर देशमुख यांचे कुटुंब सहभागी झाले. त्यांच्या पत्नी तथा मोहोळ पंचायत समिती उपसभापती साधना देशमुख, मुलगी सृष्टी देशमुख, मुलगा शंभुराजे देशमुख या आंदोलनात सहभागी झाले. लेखी पत्र द्या अन्यथा महिला हातात लाटणे घेऊन पालकमंत्र्यांना जाब विचारतील, असे त्या या वेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना म्हणाल्या.
सोलापूर जिल्ह्यातील गावोगावचे शेतकरी पेटून उठले असून आज टाकळी (टें), वडोली, उजनी (मा), पांढरेवाडी, कविटगाव यासह आजपर्यंत ५३ ग्रामपंचायतींनी ठराव समक्ष दिले. हे त्याचे उदाहरण आहे. शासन आदेश काढत नसल्याने नाराजी सूर उमटत आहे.
जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल मस्के, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासाहेब गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, तानाजी सलगर, सरपंच हरी माने, वडोलीचे सरपंच तानाजी गाडे-पाटील, भारत माने, औदुंबर घाडगे, उजनी सरपंच अविनाश निकम, शिवाजी जाधव, सदस्य बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, कुलदीप पाटील, अक्षय शिंदे, विष्णू तात्या बिचकुले उपस्थित होते.