शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अनुराधा नक्षत्रावर उद्या केव्हाही गौरी आवाहन करता येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 17:54 IST

सोलापूर दि २८ : लक्ष्मी अर्थात गौरींचे मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर आगमन होत आहे. सोन्या - रूप्याच्या पावलाने येणाºया लक्षींचे स्वागत करण्यासाठी घरोघरी तयारी केली जात आहे.

ठळक मुद्देगौरींचे मुखवटे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी सोन्या - रूप्याच्या पावलाने येणाºया लक्षींचे स्वागत करण्यासाठी घरोघरी तयारी ३० आॅगस्ट रोजी गौरीपूजन व भोजनगुरूवार दि. ३१ आॅगस्ट रोजी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : लक्ष्मी अर्थात गौरींचे मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर आगमन होत आहे. सोन्या - रूप्याच्या पावलाने येणाºया लक्षींचे स्वागत करण्यासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी यासंदर्भात सांगितले की, मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर केव्हाही गौरी आवाहन करता येणार आहे. ज्येष्ठ नक्षत्रावर ३० आॅगस्ट रोजी गौरीपूजन व भोजन असून, गुरूवार दि. ३१ आॅगस्ट रोजी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन आहे.  त्यानंतर परंपरेनुसार दोरे घेता येतील, असे ते म्हणाले. गणेशोत्सवाचा आनंद व्दिगुणित करणारा हा सण महाराष्टÑात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परगांवी असलेले लोक आवर्जुन महालक्ष्मीच्या सणासाठी आपल्या मूळ घरी येतात. तेथे सहकुटुंब हा सण साजरा केल्यानंतर गौरी विसर्जनानंतर आपल्या कामाच्या गावी परतात. गौरीपूजनाच्या आधी या काळात शेतामध्ये पिकणाºया सर्व पालेभाज्या आणि फळभाज्या गौरीच्या महानैवद्यासाठी आवर्जुन करण्याची पध्दत आहे. याशिवाय गौरी आगमनाच्या दिवशीच फराळाच्या पदार्थही गौरीसमोर ठेवले जातात. घरोघरी हे पदार्थ केले जात असले तरी हल्ली बाजारात ते तयार मिळत आहेत.गौरींचे मुखवटे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी दिसत असली तरी यंदा वस्तू - सेवा कराची अंमलबजावणी आणि तत्पूर्वी झालेल्या नोटाबंदीमुळे बाजारात मंदी असल्याचे व्यापाºयांकडून सांगण्यात आले. मुख्यवट्यांचा दर ८०० रूपयांपासून १८०० रूपयांपर्यंत आहे. पेणहून आलेले मुखवटे स्थानिक कलाकाराने बनविलेल्या मुखवट्यांपेक्षा किंमतीने अधिक आहेत.  गौरीपुढे मांडण्यात येणाºया सजावटीचे साहित्य तर हल्ली सोलापुरात पदपथांवर विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, तेथे चार खेळण्यांचा सेट १५० ते २५० रूपयांपर्यंत उपलब्ध आहे.