लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या वतीने ‘उंच माझा झोका सन्मान स्त्रीचा’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा कोविड योद्धा म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कमलताई ठकार यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी ठकार म्हणाल्या, आज समाजातील नाती संपत चालली आहेत, माणसं माणसापासून दूर चालली आहेत. समाजामध्ये जे वाईट, दूषित व घाण आहे, ते विष पचवण्याची ताकद आपल्यात निर्माण झाली पाहिजे. समाजाला चांगल्या गुणांची जाणीव करून द्यावी लागते यासाठी लायनेस क्लबचा उपक्रम चांगला असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात क्लबच्या अध्यक्ष डॉ.प्रज्ञा हाजगुडे म्हणाल्या, समाजाच्या विविध क्षेत्रात महिला धडाडीने काम करत आहेत. अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रेरणा देण्याच्या हेतूने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगितले.
प्रा.डॉ.भारती रेवडकर, विजयश्री पाटील, स्मिता कोरके आदींनी सत्काराला उत्तर देताना क्लबचे आभार व्यक्त केले. यावेळी उर्मिला गिरीगोसावी यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.
व्यासपीठावर प्रांताध्यक्ष वैभवी बुडूख, रिजन कोऑर्डिनेटर मीनाक्षी पाचकवडे, रिजन चेअरमन डॉ. अभिजित जोशी, झोन चेअरमन रविप्रकाश बजाज, लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश चौहान, लायनेस क्लबच्या अध्यक्ष डॉ.प्रज्ञा हाजगुडे, सचिव विद्या काळे, खजिनदार डॉ. गीतांजली पाटील, प्रकल्प प्रमुख जयश्री ढगे, अतुल सोनिग्रा, डॉ. सागर हाजगुडे, प्रकाश फुरडे आदींचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनाली कसपटे, अनिता परमार, अनिता सोनिग्रा, पल्लवी बजाज, शर्वरी फुरडे, योगिता कटारिया, पूजा कोठारी, प्रांजली कुलकर्णी, सिद्धी सरवदे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन काजल चौहान, शीतल जैन, अर्चना आवटे, वैशाली जाधव यांनी केले. आभार विद्या काळे यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
यावेळी अर्चना काळे (वीरपत्नी), भारती रेवडकर (साहित्यिक), डॉ.एल.एम. तांबारे (स्त्रीरोगतज्ज्ञ), रसिका जाधव (सामाजिक कार्यकर्त्या), विजयश्री पाटील (शिक्षण क्षेत्र), उषा तनपुरे (प्रगतिशील शेतकरी), स्वाती ठोंगे (उद्योजिका), साची वाडकर (महिला वैमानिक), ऐश्वर्या कांबळे (सिनेअभिनेत्री), रुपाली यमगर (धनुर्विद्या विजेती)
कोविड योद्धा म्हणून या महिलांचा झाला सन्मान
डॉ.शीतल बोपलकर, डॉ.अंजली शिंदे-बुरगुटे, शबाना कोतवाल, स्मिता कोरके, अनिता मिसाळ, मीना जाधव, भारती सोनवणे, कल्पना पेंडलवार, लता शिंदे, श्रीदेवी बरबडे यांचा सन्मान झाला.
----