शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

करमाळ्यात धाडीत सापडले नगर, उस्मानाबाद, पुण्यातील जुगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

करमाळा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करमाळा-कर्जत रस्त्यावर एका ढाब्याच्या पाठीमागे इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ...

करमाळा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करमाळा-कर्जत रस्त्यावर एका ढाब्याच्या पाठीमागे इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तीन लाख रोकडसह सात लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४० जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईतील आरोपी हे सोलापूरसह अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत.

याबाबत पोलीस नाईक परशुराम बलभीम शिंदे यांनी करमाळा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दिली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

करमाळा शहरात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ग्रामीण भागात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. करमाळा-कर्जत रस्त्यावर एका ढाब्याच्या पाठीमागे इमारतीत हा जुगार अड्डा सुरू होता. पथकाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धाड टाकताच गोलाकार बसून जुगार खेळणारे पोलिसांच्या हाती लागले.

पंडित पवार (३७, रा. जवळा ता. जामखेड), अक्षय गायकवाड (२३), विनोद जुंदळे (३७), अजयकुमार पंडित (३२, तिघे रा. नागोबा मंदिर करमाळा), लखन अंधारे (३१, रा. वडगाव उत्तर, करमाळा), ऋषीकेश आलाट (२२), अविनाश मंडलिक (२१, दोघे रा. रेणुका नगर, करमाळा),

अजिनाथ कचरे (३८), गजानन काळे (४०), संदीप माने (५०), गणेश क्षीरसागर (४०), गणेश शिंदे (३७, पाचहीजण, रा. राशीन, ता .कर्जत), संभाजी गायकवाड (३९, रा. मंगळवार पेठ, करमाळा), सतीश ननवरे ( ३३, रा.शेळगाव, ता.इंदापूर), गोरख मारूती कवितके (४३, रा.जंक्शन, ता. इंदापूर), गिरीष रमणदास देवी (३५, रा.मंगळवार पेठ, करमाळा), मारूती मासाळ (४२, रा. आगोती नं.१ पुणे) , इश्वर पाटील (५२, रा.महिंद्र नगर, करमाळा), संतोष जाधव (४२, रा.सुमंत नगर, करमाळा), श्रीकांत पोळ (३२, रा.चिखलठाण, करमाळा), नानासाहेब कुमटकर (५७, रा.नागलवाडी, अहमदनगर), बाळासाहेब रामचंद्र शिंदे (५३, रा.चापडगाव, ता. कर्जत), इब्कबाल शेख (४१, रा.देवळाली ता.करमाळा) , तुकाराम खरसडे (३४, रा. तांदूळवाडी, ता.परांडा), सचिन कवडे (४३, रा.रंबापूरा गल्ली, करमाळा), सोहेब राज (३१, रा.सुतार गल्ली, करमाळा), गणेश जाधव (४०, रा.वडर गल्ली इंदापूर), सुजित यादव (२७, रा.झारखंड हल्ली करमाळा), रंजित खरसडे (४२), मकरंद खरचडे (४१), सूरज होगले (२२, तिघे रा.तांदूळवाडी, ता.परांडा), संजय आव्हाड (३८, रा. जवळा, ता. जामखेड), संतोष जाधव (३७, रा.वडर गल्ली, इंदापूर) तेजस पाटील (३५, रा.धर्मपूरी ता.माळशिरस), सुनील भांगे ( ४८, रा.सिचंन भवन, करमाळा), आप्पासाहेब घनवट (४९, रा.चापडगाव, ता.कर्जत), महेश गायकवाड (२६, रा.वडर गल्ली, करमाळा), देविदास कोळेकर (३०, रा.कूंकूंगल्ली, करमाळा), दीपक वाळूजकर (४० ,रा.जवळा ता. जि. अहमदनगर), सुनीलद पंडित (२६, रा.झारखंड हल्ली करमाळा) यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत,

---

जुगार चालक निष्पन्न

हा जुगार अड्डा कोण चालवितो याची चौकशी करता तो संतोष अंबादास जाधव (४२, रा.सुमंत नगर करमाळा) हा चालवित असल्याची माहिती पुढे आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ जयराम खुणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरूदेव वामन पारेकर, श्रीकांत विजय गायकवाड, पोलीस नायक लालसिंग राठोड, अजय वाघमारे, राहूल सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.