शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वारीत भाविकांचे संवाद ऐकून अवगत केल्या चार भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:40 IST

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक शिकतात अनेक भाषा

ठळक मुद्देढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी देशातील कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यासह देश-विदेशातून लाखो भाविक येतात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक प्रज्ञा येमलवार हे त्या त्या प्रांतातील भाविकांना त्यांच्या भाषेत मंदिरातील नियम, अटी समजावून सांगतात भाविकांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य समुपदेशन केल्याने किरकोळ कारणावरुन होणारे वाद थांबतात

सचिन कांबळे

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी बहुभाषिक येतात. त्यांचे विविध भाषेतील बोल सतत कानावर पडतात. ते बोल ऐकून ऐकून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषा अवगत झाल्याची माहिती सुरक्षा रक्षक प्रज्ञा येमलवार यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रज्ञा येलमवार या मागील १० वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कमी वेळेत चांगले दर्शन घडवण्याचे काम त्या करतात. 

श्री विठ्ठलाचा महिमा देशभर प्रसिद्ध असल्याकारणाने देशाच्या विविध कानाकोपºयातून भाविक दर्शनासाठी येतात. यामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक विविध भाषिक असतात़ प्रत्येक भाविकाला मराठी भाषा समजत नाही. यामुळे पंढरपुरात आल्यानंतर त्यांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागते. त्याची गैरसोय होत असते.

मंदिरात आल्यानंतर दर्शन रांगेत भाविकांची अनेकवेळा तू-तू मैं-मैं होत असते,परंतु सुरक्षा कर्मचारी प्रज्ञा येमलवार यांनी मंदिरात येणाºया भाविकांच्या माध्यमातून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांचे पुरेसे ज्ञान अवगत केले आहे. यामुळे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी भागातील येणाºया भाविकांशी संवाद साधताना आता अडचणी येत नसल्याचे त्या सांगत होत्या़

त्यांच्याच भाषेत माहिती दिल्याने भाविक समाधानी- पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी देशातील कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यासह देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यांचे श्रद्धास्थान एक असले तरी भाषा प्रांत मात्र वेगवेगळी आहेत़ त्यामुळे पंढरपुरात आल्यानंतर येथील मराठी भाषा मंदिराचे नियम, अटी त्यांना समजणे अवघड असते. भाषा न येण्यामुळे अनेकदा वादही उद्भवतात; मात्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक प्रज्ञा येमलवार हे त्या त्या प्रांतातील भाविकांना त्यांच्या भाषेत मंदिरातील नियम, अटी समजावून सांगतात. भाविकांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य समुपदेशन केल्याने किरकोळ कारणावरुन होणारे वाद थांबतात़ शिवाय भाविकही दर्शन घेऊन समाधानाने जातात़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी