आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली. फरजान गुलाम मोहम्मद मदारी (वय ७), नर्गीस दिलशाद मदारी (वय ८), सोनी वरकत मदारी (वय ५), ज्योती गुलाम मोहम्मद मदारी (वय ६, सर्व रा. भोगाव) अशी उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची नावे आहेत.बुधवारी दुपारी भोगाव येथील शेती गट नं. १३२ मध्ये वरील चौघां बालकांनी बदाम समजून नजरचुकीने एरंडीच्या बिया खाल्या. त्यामुळे सायंकाळी या सर्वांना त्रास होऊ लागल्याने पालकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
विषबाधा झाल्याने सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 14:32 IST
बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली.
विषबाधा झाल्याने सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल
ठळक मुद्देपालकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलेसिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहेचौघां बालकांनी बदाम समजून नजरचुकीने एरंडीच्या बिया खाल्या