शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील किल्ला बालोद्यानची दुरवस्था,बाग अन् झाडे पाण्याअभावी जळू लागली

By admin | Updated: March 31, 2017 14:54 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरशिवाजी सुरवसे सोलापूर : बागेचे संवर्धन व्यवस्थित होत नसल्याचे कारण पुढे करून भारतीय पुरातत्त्व खात्याने भुईकोट किल्ल्यातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या किल्ला बालोद्यान या बागेचा ताबा घेतला खरा; मात्र आता या बागेची वाईट अवस्था पुरातत्त्व खात्याने करून ठेवली आहे़ पाणी नसल्यामुळे बागेतील अनेक झाडे वाळू लागली आहेत़ त्यामुळे पुरातत्त्व खात्याला १५ रुपये प्रवेश फी देऊन केवळ ओसाड बाग पहावी लागत आहे.किल्ल्याच्या मालकीचा ११ हेक्टर आणि ३३ आर एवढ्या जागेचा उतारा आहे़ किल्ल्याच्या मध्यवर्ती भागातील बाग मनपाकडे बरीच वर्षे होती़ पूर्वी या ठिकाणी साऊंड सिस्टीम, कारंजे, छानशी झाडी होती; मात्र कालांतराने याकडे दुर्लक्ष झाले़ आता तर पुरातत्त्व खात्याने तर करायचे नाही आणि दुसऱ्यालाही करु द्यायचे नाही अशी भूमिका घेतल्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत़भारतीय पुरातत्त्व खात्याच्या मुंबई विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. एस. बाडीगर यांनी आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांना बागेचा ताबा देण्याबाबत पत्र पाठविले आहे. भुईकोट किल्ल्यात बाग आहे. दिवसा ही बाग पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात होती तर सायंकाळनंतर महापालिकेकडे बागेचा ताबा होता; मात्र आता या बागेचा पूर्ण ताबा हा पुरातत्त्व विभागाकडे आहे़ दुरुस्ती, देखभालीच्या अटीवर सुरुवातीला २३ जानेवारी १९८३ ते २५ जानेवारी २00८ या २५ वर्षे कालावधीसाठी ही बाग महापालिकेला पुरातत्त्व खात्याने लीजवर दिली होती. २00८ मध्ये करार संपल्यावर पुन्हा पाच वर्षांसाठी म्हणजे २४ जानेवारी २0१३ पर्यंत या करारास मुदतवाढ देण्यात आली. जानेवारी महिन्यापासून या किल्लाबालोद्यानचा पूर्ण ताबा पुरातत्त्व खात्याकडे आहे़ किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खंदक व हुतात्मा बाग आहे. या बागेची मालकी महापालिकेची आहे. स्मार्ट सिटी योजनेत या बागेचा विकास प्रकल्प सादर करण्यात आला होता. यासाठी दोन कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीतील या पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन २५ जून २०१६ रोजी झाले. बाग किल्ला क्षेत्रालगत असल्याने सुशोभीकरणाच्या बांधकामास पुरातत्त्व खात्याची परवानगी आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने पुरातत्त्व खात्याच्या मुंबईच्या विभागीय कार्यालयाकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही़ पुरातत्त्व खात्याच्या मुंबई विभागाचे अधीक्षक बाडीगर यांनी पाहणी केली असून सुशोभीकरणाचे काम पुरातत्त्व खात्यानेच करावे असा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे़ अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत़---------------अधिकाऱ्यांची उडवाउडवीच्बागेतील पाण्याची मोटार बंद आहे; मात्र ती खरेदी करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पैसे नाहीत़ आता मार्च एण्ड आहे खूप कामे आहेत, आग्रा ब्रँचकडे याबाबींचा पाठपुरावा करावा लागेल़ आम्ही तरी काय करणार असे मत पुरातत्त्व विभागाचे दसरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले़ --------------------- बागेतील अनेक झाडे वाळू लागली, बालोद्यान ओसाड बनतेय.- झाडांना पाणी देण्याची आणि देखभाल करण्याची सोय नाही.- किल्ल्यांच्या डागडुजीकडे आणि सुशोभीकरणाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष.- किल्ला परिसरात अनेक बांधकामे मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष.- किल्ला बनला आता अवैध व्यवसायाचा अड्डा.-----------------किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे़ अनेक ठिकाणी झाडेझुडपी वाढली आहेत़ बगिचासाठी पाणी नाही़ पुरातत्त्वचे अधिकारी दुर्लक्ष करतात़ सावरकर मैदानाकडील गेट उघड्याबाबत वारंवार आदेश येऊनही कारवाई केली जात नाही़ या किल्ल्याचे सुशोभीकरण करुन संवर्धन केले पाहिजे़ - भीमाशंकर दर्गोपाटील