शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट आलेल्या वाहनाच्या धडकेत हेल्मेटचे तुकडे होऊन माजी सैनिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

पोलीस सूत्रांनुसार अर्जुन भागवत गुंड (५० अनगर, सध्या रा. मोहोळ) हे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार पाकणी येथील इंडियन ...

पोलीस सूत्रांनुसार अर्जुन भागवत गुंड (५० अनगर, सध्या रा. मोहोळ) हे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार पाकणी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये हेड सिक्युरिटी इन्चार्ज होते. नेहमीप्रमाणे ते आपल्या (एमएच-१३ एसी-५२१६) दुचाकीवरून हेल्मेट घालून इंडियन ऑइल कंपनीकडे ते निघाले होते. सकाळी ७ वाजेदरम्यान वडवळ फाट्याजवळील बोडके यांच्या शेती फार्मसमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.

----

टोलच्या कर्मचाऱ्यांनी दिली खबर

अपघात एवढा भीषण होता की, त्यांच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेटचे तुकडे पडून, डोक्याला गंभीर मार लागला. यातच माजी सैनिक ठार झाला. या अपघातप्रकरणी सावळेश्वर टोल प्लाझाचे कर्मचारी राहुल पांडे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली. अधिक तपास अपघात पथकाचे सहायक पोलीस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

फोटो .

अर्जुन गुंड