मंगळवारी कोंडी- बीबीदारफळ रस्त्यालगत एलएचपी कंपनीजवळील झाडीतून असलेल्या वाटेवरून जाणाऱ्या कामगारांना हिस्त्र बिबट्या आढळला होता. त्यानंतर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. आढळलेल्या ठशावरून बिबट्याच असल्याचे वन अधिकाऱ्यांचे मत आहे. मंगळवारी औद्योगिक वसाहतीलगतच्या कोंडी, अकोलेकाटी व बीबीदारफळ गावात वन खात्याकडून जनजागृती करण्यात आली. त्
यानंतर बुधवारी सहायक उपवनसंरक्षक बाबा हाके यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार, वनपाल शंकर कुताटे, वनसंरक्षक यशोदा आदलिंगे उपस्थित होते.
----
खात्रीनंतरच सांगता येईल
ठसे तर बिबट्यासारखेच असल्याचे अधिकाऱ्यांचे मत असले तरी खात्री झाल्यानंतरच बिबट्या की इतर प्राणी हे सांगता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वन खात्याचे एक पथक या भागात गस्त घालत असून, लोकांनी जागरूक राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
---