शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

धावणे खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेप

By admin | Updated: May 9, 2014 09:41 IST

सहकारी पतसंस्थेचे सचिव बजरंग धावणे (४५) यांचा सुपारी देऊन खून केल्याच्या आरोपावरून पंढरीनाथ पवार (४0) याच्यासह पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक, सेवक सहकारी पतसंस्थेचे सचिव बजरंग धावणे (४५) यांचा सुपारी देऊन खून केल्याच्या आरोपावरून पंढरीनाथ पवार (४0) याच्यासह पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनकुमार देवरे यांनी जन्मठेप व प्रत्येकी १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रकाश उर्फ बुद्धा रामचंद्र शिंदे (२५), सोन्या मेटकरी , पंढरीनाथ पवार, गहिनीनाथ गोवर्धन धावणे (४६), प्रशांत पांडुरंग सावंत (४२) अशी शिक्षा झालेल्यांची नावे असून, अमर माने याची सबळ पुराव्याअभावी निदार्ेष मुक्तता करण्यात आली. बजरंग धावणे हे १६ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी साडेबारा वाजता पडसाळी व मसलेचौधरी गावाच्या हद्दीजवळ मोटरसायकलीवरून आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. सोलापुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान धावणे यांचा मृत्यू झाला होता़ त्यांचा मुलगा स्वप्निल (१६) याने दिलेल्या फिर्यादीवरून मारेकर्‍यांविरूद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केलेल्या तपासावरून पंढरीनाथ पवार यानेच सुपारी देऊन धावणे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. धागेदोरे हाती लागत नसल्याने पोलिसांनी पतसंस्थेचा इतिहास तपासला. त्यावेळी धक्कादायक कहाणी समोर आली. पंढरीनाथ पवार, गहिनीनाथ धावणे, प्रशांत सावंत हे सचिव कोण व्हायचे आणि कर्ज व लाभांश वाटपावरून बजरंग धावणे यांना धारेवर धरत होते. त्यांच्यावर पाळत ठेवली. पंढरीनाथ याला ताब्यात घेतल्यावर गुन्हा उघड झाला. त्याला सचिव व्हायचे होते पण बजरंग पद सोडत नव्हते. त्यामुळे चिडून इतरांच्या मदतीने पवार यांनी सोन्या मेटकरी व प्रकाश याला चार लाखांची सुपारी दिली. पोलिसांनी सहा जणांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस सरकारतर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजू एकूण घेत न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)