कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सन २०२१-२२ मधील अक्कलकोट तालुक्यातील सोयाबीन व भुईमूग पिकांचे झालेले नुकसान याबाबत माहिती देऊन, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, याची मागणी केली होती. मागील महिन्यात गाव कामगार तलाठी, विमा कंपनीचे अधिकारी यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी स्वतः विविध महसूल मंडलात पाहणी केली. याविषयी नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या अहवालानुसार तालुक्यात सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. एकूण ५९७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. उत्पन्नात ५९.१६ टक्क्यांची घट झाल्याने नुकसानभरपाईपोटी रक्कम वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
....................
भुईमुगाच्या ५७ टक्के उत्पन्नात घट
भुईमुगास पहिल्यांदाच विमा कवच प्राप्त झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात १५०२ हेक्टरावरील भुईमुगाला २५ टक्के आगाऊ भरपाई मिळणार आहे. त्यात अक्कलकोट, जेऊर, तडवळ व करजगी मंडलातील ६५६ हेक्टरवरील ५५.२४ टक्के, दुधनी व मैंदर्गी मंडलातील ३५२ हेक्टरमधील ५८.६१ टक्के, तर चपळगाव, किणी व वागदरी मंडलातील ४९४ हेक्टरवरील भुईमुगात ५६.९१ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा सरासरी ५७ टक्के उत्पन्नात घट झाली आहे.
310821\1713-img-20210831-wa0025.jpg
अक्कलकोट तालूक्यातील विविध महसुल मंडलात पीक नुकसानीची पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, विमा कंपनीचे अधिकारी व गाव कामगार तलाठी..