शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी जाचाला कंटाळून चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:17 IST

खासगी कर्जामुळे सावकारांकडून तगादा लावण्यात येत असल्याचे, आत्महत्येपूर्वी कल्याण यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्रालयाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते.

सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण राममोगली पडाल (३८) यांनी रविवारी घरात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्करोगाचा त्रास आणि चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले खासगी कर्ज अशा दुहेरी संकटात सापडल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.खासगी कर्जामुळे सावकारांकडून तगादा लावण्यात येत असल्याचे, आत्महत्येपूर्वी कल्याण यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्रालयाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते. या अर्जाची प्रत आता स्थानिक पोलिसांना देण्यात आल्याचे पडाल कुटुंबीयांनी सांगितले.कल्याण यांचे ज्येष्ठ बंधू प्रा़ व्यंकटेश पडाल यांनी सांगितले की, ‘बांधकाम व्यवसायातून जमवलेले काही पैसे कल्याणने ‘म्होरक्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुंतवले़ दुर्दैवाने कल्याणला यकृताचा कर्करोग झाल्याचेही निष्पन्न झाले़ या धक्क्याने वडिलांचे महिन्यापूर्वीच निधन झाले़ तसेच कर्करोग उपचारांसाठी कल्याणने खासगी सावकाराकडून काही पैसे घेतले होते़ त्यामुळे सावकारांचा तगादा सुरू होता़’पडाल यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे़ स्थानिक नागरिक व मित्र परिवारातही शोक व्यक्त होत आहे़ हरहुन्नरी निर्माता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे़

टॅग्स :Suicideआत्महत्या