शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांतील अनुशेष भरणार

By admin | Updated: May 11, 2014 01:19 IST

पणन संचालक : सुभाष माने यांची माहिती

 

सोलापूर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. तो लवकरच प्रमाणित करून अनुशेष पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे नूतन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी सोलापुरात बोलताना दिली. डॉ. सुभाष माने हे दोन दिवसांच्या सोलापूर दौर्‍यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सचिवांची आढावा बैठक सोलापूर बाजार समितीमध्ये पार पडली. आज सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप करताना त्यांनी पणन खात्याशी संबंधित योजनांची माहिती दिली. बाजार समित्यांमध्ये दीर्घकाळापासून मागासवर्गीय कर्मचार्‍यांचा अनुशेष आहे. हे कर्मचारी न्यायालयीन लढा देत असताना त्यांना पणन विभागाकडून न्यायाची अपेक्षा आहे. याकडे डॉ. माने यांचे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले, आज सकाळीच कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी मला भेटले, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही मोठा अनुशेष असून दीर्घकाळापासून तो तसाच असल्याने पदोन्नती रखडली. भरती प्रक्रिया सदोष असल्याची त्यांची तक्रार मला मिळाली आहे. राज्यभरात हीच स्थिती कमी-जास्त प्रमाणात आहे. सर्वच बाजार समित्यांच्या स्थितीचा आढावा घेऊन त्यांचा अनुशेष भरण्यासाठी मी पुढाकार घेईन. आधारभूत किमतीत शेतीमालाचे खरेदी केंद्र उघडताना बाजार समित्या चालढकल करतात. याकडेही पणन संचालकांचे लक्ष वेधण्यात आले. शासन खाजगी बाजार समित्यांना प्रोत्साहन देत असल्याने राज्यात ३३ नव्या बाजार समित्यांना परवाने देण्यात आले. शेतीमालाची खरेदी-विक्री नियमित सुलभपणे व्हावी, शेतकर्‍यांना न्याय मिळावा, त्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात याकडे पणन खाते लक्ष देत असल्याने शेतकर्‍यांच्या तक्रारीत घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

--------------------------

भूविकास बँकांना टाळे... ४राज्यातील भूविकास बँका शेवटच्या घटका मोजत आहेत. राज्य मंत्रिमंडळात भूविकास बँका पुन्हा सुरू करण्यासंदर्भात चर्चा घडल्या मात्र प्राप्त परिस्थितीत या बँका सुरू होण्याची शक्यता धुसर असल्याची माहिती डॉ. माने यांनी दिली. ४१९९७ पासून भूविकास बँकांनी कर्जवाटप बंद केले आहे. सध्या कर्मचार्‍यांच्या वेतनाइतकी रक्कम वसूल होत आहे. ४जिल्हा शाखेसह शिखर बँकेची संपूर्ण मालमत्ता शासकीय मूल्यांकनाप्रमाणे ३१२ कोटींची आहे. ४या बँका पुन्हा सुरू करण्यासाठी १४00 कोटींची गरज आहे. ही रक्कम उपलब्ध होणे शक्य नसल्याने बँकांचे भवितव्य अंधकारमय बनल्याचे त्यांनी स्पष्ट केले

. -----------------------------------------------------

माहितीचा अधिकार... बाजार समित्यांना माहितीचा अधिकार लागू आहे. माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केल्यास अपिलाची तरतूद आहे. नागरिकांनी त्याचा वापर केला पाहिजे़ काही बाजार समित्या टाळाटाळ करीत आहेत हे योग्य नाही...... - डॉ.सुभाष माने पणन संचालक