शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

बापानेच सुपारी देऊन केला पोटच्या मुलाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:23 IST

विजय विलास सरगर (वय २१, रा. कवलापूर, ता. मिरज) असे मृताचे नाव आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी वडील विलास ...

विजय विलास सरगर (वय २१, रा. कवलापूर, ता. मिरज) असे मृताचे नाव आहे.

या खूनप्रकरणी पोलिसांनी वडील विलास बाबू सरगर (४५), उत्तम महादेव मदने (२७, सध्या रा. डेरवली, उरण पनवेल मूळ रा. लक्ष्मीनगर सांगली, प्रकाश गोरख कोळेकर (२४), संतोष विठ्ठल पांढरे (२६) व वैभव तानाजी आलदर (१९) सर्व रा. कोळा, कराडवाडी, ता. सांगोला) यांना अटक केली आहे.

दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी पाच जणांना न्यायालयात हजर केले. न्यायाधीश देशमुख यांनी त्यांना १ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.

१५ जुलै रोजी बुद्धेहाळ येथील तलावात अनोळखी इसमाचे धडावेगळे शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. याबाबत, पोलिस पाटील सोपान गडदे यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली होती.

पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस पथके पाठवली होती. तपासादरम्यान सांगली पोलिसांनी विलास बाबू सरगर या संशयिताला ताब्यात घेऊन सांगोला पोलिसांच्या ताब्यात दिले. सांगोला पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली. यात त्याने सुपारी देऊन पोटच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी केला. तपासकामी सहायक पोलीस फौजदार कल्याण ढवणे, पोलीस हवालदार राजू चौगुले, पोलीस नाईक विजय थिटे, दत्तात्रय वजाळे, आप्पा पवार, लक्ष्मण वाघमोडे, गणेश कुलकर्णी, गणेश कोळेकर, सायबर गुन्हे शाखेचे अनवत आतार, सुनील लोंढे, मनोहर भुजबळ यांनी मदत केली.

-----

असा रचला कट

पोलिसांनी या गुन्ह्यात उत्तम महादेव मदने, प्रकाश गोरख कोळेकर, संतोष विठ्ठल पांढरे व वैभव तानाजी आलदर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. बापानेच पूर्वनियोजित कट करून ११ जुलैला विजय सरगर यास डाळिंबाची स्वस्त दरात खरेदी करून देण्याचा बहाणा करून त्याला टमटम घेऊन बोलावून घेतले. त्याच्यासोबत कोळा येथील यश हॉटेलमध्ये जेवण करून ठरलेल्या कटाप्रमाणे रात्री ११ ते १२ च्या दरम्यान मोकळ्या रानात कोयत्याने विजयचे शीर धडावेगळे करून त्याचा खून केला. मृतदेह चटई व शेडनेटमध्ये दोरीने बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगड बांधून बुद्धेहाळ तलावात टाकून दिला, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

------