शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढण्यासाठी कुर्डूवाडी पंचायत समितीसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:21 IST

: टेंभुर्णी (ता.माढा) येथील कसबा वाडा हद्दीत ग्रामपंचायत मालकीच्या जागेत काही जणांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारकर्ते नीलेश गायकवाड व ...

: टेंभुर्णी (ता.माढा) येथील कसबा वाडा हद्दीत ग्रामपंचायत मालकीच्या जागेत काही जणांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारकर्ते नीलेश गायकवाड व नीलेश फुले यांनी बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

यावेळी टेंभुर्णी विभागाचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भारत रेपाळ यांनी त्यांना संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसात गुन्हा दाखल करीत असल्याचे फोनद्वारे कळविल्यानंतर त्या दोघांनी उपोषण दुपारी मागे घेतले.

बुधवारी सकाळी ११ वाजता टेंभुर्णी येथील कसबा वाडा हद्दीत काही व्यक्तीने ग्रामपंचायतच्या जागेमध्ये अतिक्रमण केले असल्याचे पंचायत समिती प्रशासनाला वारंवार कळवून देखील कारवाई न झाल्याने पंचायत समितीच्या कार्यालयासमोरच उपोषण करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीला सुटी असल्याने त्यांचे निवेदन येथील सुरक्षारक्षक पोपट बागल यांनी घेतले. गेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून देखील टेंभुर्णी ग्रामपंचायत व वरिष्ठ याकडे दुर्लक्ष करीत आहे. वरिष्ठ प्रशासन आतून अनास्था दाखवत असल्याचे तक्रारकर्ते यांचे म्हणणे आहे.

१४कुर्डूवाडी-उपोषण

कुर्डूवाडी पंचायत समितीच्यासमोर टेंभुर्णीतील कसबा वाडा येथील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण करताना तक्रारकर्ते.