शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांवर केवळ कारवाईचा फार्स

By admin | Updated: February 3, 2015 17:34 IST

एफ.आर.पी. प्रमाणे दर न देणार्‍या कारखान्यांवर केवळ कारवाईचा फार्स केला जात असून नोटिसा अन् सुनावण्या घेण्यात वेळ घालविला जात आहे.

अरुण बारसकर■ सोलापूर

एफ.आर.पी. प्रमाणे दर न देणार्‍या कारखान्यांवर केवळ कारवाईचा फार्स केला जात असून नोटिसा अन् सुनावण्या घेण्यात वेळ घालविला जात आहे. साखर कारखानदारांच्या एकजुटीपुढे शासनाने नांगी टाकत ऊस उत्पादक शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. यावर्षी १७६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. यापैकी १५0 साखर कारखान्यांनी उसाला एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला नाही. एफ.आर.पी. प्रमाणे दर देणे कायद्याने बंधनकारक असताना १५0 साखर कारखाने घसरलेल्या साखर दराचे कारण पुढे करीत कायद्याला आव्हान देत आहेत. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एफ.आर.पी. नुसार दर न देणार्‍या साखर कारखान्यांची साखर जप्त करण्याची कारवाई केली जाईल असे वारंवार सांगितले असले तरी हा केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर कारखाने सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा यासह सोलापूरच्या एका कारखान्याने एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला आहे. अन्य दीडशे साखर कारखाने साखरेचे दर घसरल्याने एफ.आर.पी. देणे अशक्य असल्याचे सांगत आहेत. एफ.आर.पी. न देणार्‍या साखर कारखान्यांवर आर.आर.सी. नुसार साखर जप्तीची कारवाई करण्याचा कायदा आहे. यासाठीची प्रक्रिया मागील दोन महिन्यांपासून साखर आयुक्त कार्यालयात सुरू आहे. मागील आठवड्यात सोमवारपासून सुनावण्या पूर्ण झालेल्या साखर कारखान्यांची साखर जप्त केली जाईल असे सांगितले होते. सोमवारी फेरसुनावण्या घेण्याचे नियोजन साखर आयुक्त कार्यालयाने केले. साखरेचे दर घसरल्याने उसाला एफ.आर.पी. प्रमाणे दर देणे शक्य नसल्याचे कारखानदार सांगत असताना शासन मार्ग काढण्याचा म्हणावा तसा प्रयत्न करीत नाही. साखर कारखानदारांच्या एकजुटीपुढे शासनाने नांगी टाकत राज्य शासनाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे.

एफ.आर.पी. प्रमाणे दर देणे कायद्याने बंधनकारक आहे. मी एकटाच असल्याने एकाचवेळी सुनावण्या पूर्ण करणे कठीण आहे. सुनावण्या पूर्ण झाल्या की पुढील कारवाई होईल. -बिपीन शर्मा, साखर आयुक्त(पुणे)

कारखान्यांची सुनावणी

■ सोमवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी काहीही रक्कम न देणार्‍या तीन साखर कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्तांकडे झाली ■ एफ.आर.पी. व दिलेली पहिली उचल यातील ५00 रुपयांपेक्षा अधिक फरक असणार्‍या राज्यातील २६ साखर कारखान्यांची सुनावणी ४ फेब्रुवारीपासून होणार ■ त्यानंतर उर्वरित साखर कारखान्यांची सुनावणी टप्प्याटप्प्याने. सहकार मंत्र्यांची तोंडपाटीलकी

■ सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एफ.आर.पी. प्रमाणे उसाला भाव न देणार्‍या कारखान्यांना दम भरण्याचा प्रयत्न केला परंतु कारखानदार घाबरले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य संघटनांच्या आंदोलनाची हवा काढण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सहकार मंत्री कारवाईची भाषा करीत होते,परंतु कारवाईचे कागदी घोडे नाचवित वेळ काढूपणा केल्याने सहकार मंत्र्यांची कारवाईची भाषा म्हणजे तोंडपाटीलकी ठरली आहे.