शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मका, कांदा, उडीद, तूर लागवडीवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST

यंदा तालुक्यात १० हजार ५३४ हेक्टरवर खरिपाची पिके घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीसाठी ...

यंदा तालुक्यात १० हजार ५३४ हेक्टरवर खरिपाची पिके घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मोफत बियाणे मिळणार आहे.

तत्पूर्वी खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेताची मशागत सुरू केली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभागही धावला असून, सल्ला, मार्गदर्शन, जागेवर बियाणे पुरवठा, खते, विविध योजनांमधून बियाणे, शेती अवजारे देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भीमा (चंद्रभागा), माण नदीकाठ, उजनी डावा व उजवा कालवा भागात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे, तर निरा उजवा कालवा भागात फळबांगांबरोबर मका, बाजारी, ज्वारी, कांदा, उदीड, तूर, आदी पारंपरिक खरिपांची पिके घेतली जात आहेत.

पंढरपूर तालुक्यात दक्षिण व पश्‍चिम भागातील निरा उजवा व उजनीच्या कालव्यातून शेतीला पाणी मिळत असल्याने सिंचनाची सोय झाली आहे. यामुळे डाळिंब, द्राक्ष, पेरू, बोर, अ‍ॅप्पल बोर, सीताफळ, चिकू, शेवगा, आंबा, आदी फळबांगांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे, तर खरीप पिकांची पेरणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मका, तूर, बाजरी, हरभरा, कांदा, उडीद ही पिके शेतकरी घेतात. आता येणाऱ्या खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी व माहिती घेण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रांवर भेटी देत आहेत.

ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना मोफत बियाणे

खरीप हंगामासाठी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी पेरणी करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बियाणे, रोपे देण्याची तयारी सुरू आहे. खरीप हंगामात मका ४३९० हेक्टर, बाजरी १९५, तूर १७७, मूग ६४, उडीद १४२, भुईमूग १६०, सोयाबीन ११४, तर ऊस ५२८२ हेक्टर क्षेत्र आहे. तालुका कृषी विभागाने पीक प्रात्याक्षिकांतर्गत तुरीचे ४ प्रकल्प, उडीदाचे दोन, तर बाजरीचे २० प्रकल्प हाती घेतले आहेत. यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे, त्यांनाच बियाणे मोफत मिळणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर. वाय. पवार यांनी दिली.

फोटो ::::::::::::::::::::::::::::::::::

खरीप हंगामासाठी शेतकरी बी-बियाणे, खते, खरेदीसाठी पंढरपूर शहरातील कृषी केंद्रावर अशी गर्दी करीत आहेत.

(फोटो : मोहन डावरे)