शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना जनावरे सांभाळताही अन‌् विकताही येईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:22 IST

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये ...

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार आणि जनावरांचे बाजार बंद केले होते. काही महिन्यांनंतर जनावरांचा बाजार सुरू केला. मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांचा बाजार बंद असल्याने खरेदीदार व्यापारी, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे जनावरांची खरेदी-विक्री करण्यास अडचणी येत आहेत.

जनावरांच्या खरेदी-विक्रीनिमित्त पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यांतूनही व्यापारी, शेतकरी येण्याचे पूर्णपणे थांबले आहे. जनावरांचा बाजार बंदचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांबरोबरच हातावर पोट असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्यांचे खरेदी-विक्री व्यवहार थांबल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचीही आर्थिक कोंडी झाली आहे.

लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले

कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे लॉकडाऊनच्या काळात रोज लाखो रुपयांचे उत्पन्न (सेस) बुडाले आहे. जनावरांचा बाजार बंद असल्याने बाजार समितीच्या आवारात काम करणारे हमाल, तोलार, कामगार, हॉटेल व्यावसायिक, वाहनचालक, अडत व्यापारी यांनाही मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे सभापती गिरीश गंगथडे यांनी सांगितले.