शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

'आयडीबीआय' बँकेतील भरतीसाठी बनावट जाहिराती

By admin | Updated: November 12, 2014 00:16 IST

तरुणांकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : ‘आयडीबीआय’ बँकेत सहायक रोखपालपद आणि इतर पदांसाठी भरतीची बनावट जाहिरात आणि अपॉर्इंटमेंट आॅर्डर देण्याचा सपाटाच काही अज्ञात व्यक्तींनी लावला आहे़ रोजगारासाठी भटकणाऱ्या बेरोजगार युवकांना हेरून पैसे उकळण्यासाठी अशा प्रकारच्या बनावट जाहिराती देण्यात येत आहेत़ ‘आयडीबीआय’ बँकेने याबाबत सावधान करणारी नोटीस दिली असून, अशा कोणत्याही एजन्सीज किंवा व्यक्तीशी आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन केले आहे़ गेल्या काही दिवसांपासून आयडीबीआय बँकेत सहायक रोखपालपदाची आॅर्डर, तसेच अन्य पदांसाठी नोकरीचे आमिष दाखवणारे संदेश बेरोजगारांना पाठवले जात आहेत़ नोकरीसाठी युवकांकडून लाखो रुपयांची मागणी होत आहे़ काही सावध युवकांनी याबाबत बँकेच्या निदर्शनास ही बाब आणून देताच बँकेने अशा प्रकारच्या बोगस भरतीच्या आमिषास बळी पडू नये, तसेच नोकरी देण्याच्या आमिषाने कुणी पैशाची मागणी केल्यास पैशाचा व्यवहार करू नये, असे आवाहन केले आहे़ बँकेतील कोणतीही रिकामी जागा भरण्यासाठी बँक महत्त्वाच्या वर्तमानपत्रांत, तसेच एम्प्लॉयमेंट न्यूजमध्येच जाहिरात देते़ तसेच बँकेच्या ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉट आयडीबीआय डॉट कॉम’ या वेबसाईटवर जाहिरात देण्यात येते़ या वेबसाईटवर बँकेच्या विविध भरती संदर्भातील सूचना सविस्तर देण्यात येतात़ बँकेने किंवा प्रशिक्षणासाठी कोणतीही एजन्सी किंवा व्यक्ती नियुक्त केलेली नाही़ स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच उमेदवारांची निवड केली जाते़ त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने किंवा एजन्सीने नोकरीचे आमिष दाखवून पैशाची मागणी केल्यास त्यांच्याशी व्यवहार करू नये़ त्यास बँक जबाबदार राहणार नाही, असे या नोटिसीमध्ये नमूद केले आहे़ दरम्यान, या युवकांना बनावट भरतीस बळी पाडू पाहणाऱ्यांना या युवकांचे मोबाईल क्रमांक कोठून मिळाले? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे़ याबाबत बँकेच्या मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता, काही सजग युवकांनी बँकेशी या बोगस भरतीबाबत कळवल्यानंतर ही नोटीस दिली आहे़ बँकेच्या भरतीबाबत साधारणत: दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जाहिरात दिली जाते; पण अद्याप अशी जाहिरात दिलेली नाही़ परीक्षा आयबीपीएस घेते. त्यामुळे उमेदवाराच्या भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहाराचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती दिली़ (प्रतिनिधी)सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील विविध पदांसाठी आयबीपीएस परीक्षा घेते़ दरवर्षी डिसेंबरमध्ये ही परीक्षा होते़ रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटचा, एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर व प्रमुख वर्तमानपत्रांचा संदर्भ विश्वासार्ह नोकरभरतीसाठी बँकांकडून कोणत्याही खासगी एजन्सीची नियुक्ती केलेली नसते़