शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारबद्दल शेतकºयांमध्ये प्रचंड संताप : अजित नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 15:10 IST

सोलापूर दि २१  : कर्जमाफीसाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. यासाठी पुरेशी केंदे्र उपलब्ध नाहीत. दुसरीकडे अनेक वेळा सर्व्हर जाम होत असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे अपयशी ठरली असून, यामुळे शेतकºयांत प्रचंड संताप निर्माण झाल्याचे शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१  : कर्जमाफीसाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. यासाठी पुरेशी केंदे्र उपलब्ध नाहीत. दुसरीकडे अनेक वेळा सर्व्हर जाम होत असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे अपयशी ठरली असून, यामुळे शेतकºयांत प्रचंड संताप निर्माण झाल्याचे शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीसाठी तसेच शेतकरी नेते वसंतराव आपटे यांच्या शोकसभेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. नवले हे सोलापुरात आले होते. ते पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न केले. पातळी सोडून आरोप केले, आंदोलकांवर चिखलफेक केली. शेतकºयांच्या एकजुटीमुळे त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. शेतकºयांना कर्जमाफी दिली. मात्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली. यामागे शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये, अशीच योजना असल्याचे नवले म्हणाले.या सर्व प्रकारामुळे शेतकºयांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आॅनलाईन प्रक्रिया तातडीने थांबवावी, बँकेत उपलब्ध असणाºया माहितीच्या आधारे सरसकट शेतकºयांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकºयांच्या वतीने अजित नवले यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा सुकाणू समितीचे निमंत्रक सिद्धप्पा कलशेट्टी, शिवानंद झळके, महिबूब सय्यद, खंडू वाघचौरे, महमद शेख, जावेद आवटे, रावसाहेब होनमाने आदी उपस्थित होते.---------------------लवकरच बैठकच् आॅनलाईन कर्जमाफीतील घोळाबाबत संपूर्ण माहिती घेतली जात असून, याबाबत नेमकी भूमिका ठरविण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने लवकरच राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नवले यांनी दिली.