शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या गाठीभेटीसाठी तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST

गावगाड्यात निवडणुकीचा प्रचार करत उमेदवारांना ८ दिवसातच संपूर्ण प्रभाग पिंजून काढावा लागणार आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत ...

गावगाड्यात निवडणुकीचा प्रचार करत उमेदवारांना ८ दिवसातच संपूर्ण प्रभाग पिंजून काढावा लागणार आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे. अत्यंत अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

कॉर्नर सभा, प्रचार रॅली, मतदारांच्या ‘होम टू होम’ गाठीभेटी घेत प्रचार सुरू झाला आहे. प्रत्येक प्रभागात त्या-त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करून दिली आहे. घरोघरी फिरून कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. थेट प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचाही आधार प्रचारासाठी घेतला जात आहे़ व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकद्वारे उमेदवार मतदारांच्या संपर्कात राहत आहेत. उमेदवार व कार्यकर्ते बाहेरगावी असलेल्या मतदारांची नावे शोधून त्यांना मतदानाची तारीख आणि मतदान केंद्राची माहिती देत आहेत.