शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

गेट टुगेदर पार्ट्यांवर एक्साईजचा वॉच

By admin | Updated: February 6, 2017 16:18 IST

निवडणुकीतील आचारसंहिता : मद्य विक्री, वाहतूक रोखण्यासाठी पथके तैनात

गेट टुगेदर पार्ट्यांवर एक्साईजचा ह्यवॉचह्णनिवडणुकीतील आचारसंहिता : मद्य विक्री, वाहतूक रोखण्यासाठी पथके तैनातरेवणसिद्ध जवळेकर : सोलापूरजिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाला असून, मतदान होईपर्यंत हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी होणाऱ्या गेट टुगेदर पार्ट्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ह्यवॉचह्ण राहणार आहे. निवडणुकीतील आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ह्यएक्साईजह्णने आराखडा तयार केला असून, बेकायदेशीर मद्य विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी विशेष यंत्रणा असल्याचे अधीक्षक सागर धोमकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. कर्नाटक आणि गोव्यातून बनावट दारू सोलापूर जिल्ह्यात येऊ नये, यासाठी मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी आणि अक्कलकोट तालुक्यातील दुधनीत चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. शहरातील पुणे नाका, हैदराबाद नाका, अक्कलकोट नाका आणि विजापूर नाक्यावरही चेक पोस्ट राहणार आहे. चेक पोस्टच्या दिमतीला शहरात ४ तर ग्रामीण भागात ४ भरारी पथके सज्ज राहणार आहेत. अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन निरीक्षक, १२ दुय्यम निरीक्षक, ६ सहायक दुय्यम निरीक्षक आणि ५० पुरुष, महिला कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तीन प्रभागांसाठी एक कर्मचारीमहापालिकेच्या निवडणुकीसाठी २६ प्रभागातून विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर ज्या प्रभागात पैसे अथवा दारु वाटपाच्या कोणी तक्रारी केल्या तर त्यांना तेथे तातडीने पोहोचता यावे, यासाठी एका प्रभागासाठी एका कर्मचाऱ्याची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ९ कर्मचारी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास धोमकर यांनी व्यक्त केला. बीअर बारची होणार तपासणीमतदारांना विविध आमिष दाखविण्याचे प्रकार होत असतात. विशेष म्हणजे पैसा आणि मद्य या दोन गोष्टींना ज्या-त्या पक्षाचे उमेदवार प्राधान्य देत असतात. शहर आणि जिल्ह्यातील परमिट रूम आणि बीअर बारमध्ये १० पेक्षा एकत्र पार्ट्यांचे आयोजन होत असतील तर अशा पार्ट्यांवर करडी नजर एक्साईज विभाग ठेवणार आहे. शहर, जिल्ह्यातील हॉटेल्ससह राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील ढाब्यांची तपासणी करण्याचे आदेशही सागर धोमकर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत. आचारसंहिता कालावधीत ९७ अटकेत१२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१७ या आचारसंहिता कालावधीत १२३ गुन्हे नोंदवून ९७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील ३५०१ लिटर हातभट्टी दारु, ११६.६४ लिटर देशी दारु, ४२.३ लिटर बीअर, ३१.४६ लिटर विदेशी दारु जप्त करण्यात आली. एकूण ३२ लाख ९५ हजार २६९ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपींकडून १ कार, १ रिक्षा आणि दोन मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या. कोटशहर आणि जिल्ह्यात कुठे मतदारांना दारु देण्याचे काम होत असेल तर जागरुक मतदारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा. त्यानंतर तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे. -सागर धोमकरअधीक्षक- राज्य उत्पादन शुल्क विभाग