शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वकाही आलबेल होईल !

By admin | Updated: August 5, 2014 01:32 IST

भाजपा निरीक्षकांचा दावा : समन्वयाचा अभाव; ‘देशमुख हटाव’वर विरोधक ठाम

सोलापूर : शहर भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची धुसफुस नसून, समन्वयाच्या अभावामुळे किरकोळ नाराजी आहे; येत्या आठ दिवसात सर्वकाही आलबेल होईल, असा दावा पक्षाचे प्रदेश निरीक्षक गोविंद केंद्रे आणि सुनील बढे यांनी आज केला. दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील गटाने शहराध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीसाठी ‘देशमुख हटाव’ या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले.भाजपातील असंतुष्ट नगरसेवक आणि काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार देशमुख यांच्या विरोधात ‘भाजप बचाव निर्धार’ मेळाव्याचे आयोजन करून देशमुखांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाच्या भावना जाणून घेण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष केंद्रे आणि प्रदेश सचिव बढे हे आज सोलापुरात आले. त्यांनी शहर कार्यालयात संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रे म्हणाले की, पक्षामधील समन्वयाच्या अभावामुळे थोडेसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्थिती कोणत्याही पक्षात आणि शहरात असते. आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून, कोअर समितीला अहवाल देणार आहोत. फारशी गंभीर स्थिती नसल्यामुळे आठ दिवसात नाराजी दूर होईल. भाजपमध्ये नाराज असलेले पक्षाचे जुने कार्यकर्ते असून, त्यांची निष्ठा भाजपवरच आहे, असे ते म्हणाले.पक्षातील नाराज गटाचे नगरसेवक सुरेश पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानात आमदार म्हणून देशमुख यांचा सहभाग नगण्य होता. शिवाय विकास कामांसाठी शासनाचा निधी आणला नाही. पक्षाध्यक्ष म्हणून बैठकही घेतली नाही. त्यामुळे त्यांना शहराध्यक्षपदावरून हटवावे आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी. आमची हीच भूमिका आम्ही निरीक्षकांसमोर मांडली. आमदार देशमुख यांचीही बाजू काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मांडली. देशमुख यांची स्वीकारार्हता मोठी असून, भाजपच्या मूळ मतदारांसह लिंगायत, तेलुगू आणि मुस्लीम समाजाचा देशमुखांना नेहमीच पाठिंबा असतो. शिवाय कार्यकर्त्यांच्या मदतीला ते नेहमीच धावून येतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत तेच योग्य उमेदवार आहेत, असे निरीक्षकांसमोर सांगण्यात आले.-----------------------------विरोध आहे; पण बंड नाही !आमदार देशमुख यांच्या उमेदवारीला त्यांच्यावर नाराज असलेले नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे; पण बंडखोरी करण्याची त्यांची भूमिका नाही. प्रदेश संघटनेकडून जो उमेदवार शहर उत्तर मतदारसंघासाठी निश्चित होईल. त्याच्यासाठीच काम करण्याची भूमिका नाराजांनी व्यक्त केल्याचा दावा निरीक्षक गोविंद केंद्रे यांनी केला.इच्छुकांच्या मुलाखती...प्रदेश निरीक्षक केंद्रे आणि बढे यांनी सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, माळशिरस मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. शिवाय शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. मध्य आणि दक्षिण मतदारसंघ सेनेकडून घ्यावेत, अशी त्यांची भूमिका असून, ती आपण कोअर समितीत मांडणार असल्याचे ते म्हणाले.