सांगोला शेतकरी सह. सूतगिरणी कार्यस्थळावर माजी आ. डॉ. गणपतराव देशमुख यांनी रविवारी सांगोला शहर व तालुक्यातील आजी-माजी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये जिल्ह्यासह तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी रुग्णसंख्या, रुग्णांना बेड मिळून वेळेवर उपचार होतात का? घरातील तरणीताटी पोरं, कर्तेपुरुष, वयस्कर माणसं मुत्युमुखी पडल्याने दु:ख व्यक्त केले. तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या योजनाचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुका, पाठीमागे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, सरपंच निवडी, पुरोगामी युवक संघटना, पक्षाची बांधणी यावर चर्चा केली.
या बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, शेकापक्षाचे चिटणीस विठ्ठलराव शिंदे, सभापती राणी कोळवले, उपसभापती तानाजी चंदनशिवे, समाजकल्याण सभापती संगीता धांडोरे, जि. प. सदस्य ॲड. सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, ॲड. मारुती ढाळे, पं. स. सदस्य नारायण जगताप, सीताराम सरगर, मायाप्पा यमगर आदी उपस्थित होते.
फोटो ओळ ::::::::::::::
माजी आ. गणपतराव देशमुख कार्यकर्त्याच्या मदतीने सूतगिरणी कार्यस्थळावरून बैठकीतून बाहेर पडतानाचे छायाचित्र.